मारेगाव येथे लोकन्यायालयात 205 प्रकरणांचा निपटारा

39 लाख रुपायांची तडजोड राशी जमा

भास्कर राऊत, मारेगाव: येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित 205 केसेस चा निपटारा करण्यात आला. यात 39 लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली. राष्ट्रीय लोकअदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस चा आपसी तडजोडी ने निपटारा करण्यात आला. यात वादपूर्व 205 प्रकरणे आणि दाखल आपसी तडजोड चे 40 प्रकरणे असे एकूण 205 केसेस चा लोकअदालत मध्ये निपटारा करून 39 लाख 78 हजार 998 रुपये आपसी तडजोड राशी जमा झाली.यात पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे तर सदस्य म्हणून एड. मेहमूद पठाण,सुमित हेपट यांनी कामकाज बघितले. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयिन कर्मचारी डोईजड, बी. पी. चव्हाण, आर.वैद्य,पी.वासाड, एस. टेबरें, शेबे,बुजाडे, राऊत यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.