लोकअदालत मध्ये 234 प्रकरणांचा निपटारा

एकूण 41 लाख 51 हजाराचा दंड वसूल

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 7 मे रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे 234 दाखल प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आले. या लोकअदालतीमधून 41 लाख 51 हजार 777 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

राष्ट्रीय लोक न्यायालयासाठी दोन पॅनलचे गठन करण्यात आले होते. पहिल्या पॅनलमध्ये दिवाणी न्यायाधीश के. के. चाफले, अॅड. एस. पी. व-हाटे व अॅड. आर. डी. तेलंग यांनी काम पाहिले. तर दुस-या पॅनलमध्ये सह-दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोमीडवार, अॅड. ए. टी. सिडाम व अॅड. व्ही.एम मांडवकर हे होते. त्यासह विशेष न्यायालय म्हणुन सह-दिवाणी न्यायाधीश पी.सी. बछले यांनी कामकाज बघितले. विशेष न्यायालयात एकुण 112 दाखल प्रकरणे निकाली काढण्यात आली असुन यातून 34 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

राष्ट्रीय लोकअदालत व विशेष न्यायालय यशस्वी होण्यास सहा अधिक्षक देशमुख यांच्यासह तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक जुमनाके, कनिष्ठ लिपीक निमकर व शिपाई महेश आगरे व इतर न्यायालयीन कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. त्यासह वकील संघटनेचे वकिलांनी सहकार्य करत लोकअदालत यशस्वी होण्यास मदत केली.

या लोक अदालतमध्ये पोलीस विभागातर्फे वणीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, शिरपूर ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, वाहतूक शाखा प्रमुख सपोनि संजय आत्राम, ए एस आय स्वामी, हे.कॉ. सुनील कुंटावर, सुनील मंडाळे हजर होते.

हे देखील वाचा:

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू

प्रियकराच्या प्रेमाला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच हात वर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.