आज राजूर येथे दिव्यांग बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिर

नोंदणी, प्रमाणपत्र प्रक्रिया व शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळावा या उद्देशाने क्रांतिज्योती फाउंडेशन, राजूर व लोकहित कल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर आज दि. 28 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता दीक्षाभूमी परिसर, राजूर (ता. वणी) येथे पार पडणार आहे. शिबिरात दिव्यांग व्यक्तींना विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः ऑनलाईन पोर्टलवर दिव्यांग नोंदणी प्रक्रिया, दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्याची पद्धत व आवश्यक कागदपत्रांची माहिती, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना शासकीय सुविधांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शिबिराचा लाभ दिव्यांग बांधव तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महेश लिपटे, अनिकेत चामाटे, वैभव येरेकर, सूरज पुणेकर व तृषांत साव यांनी केले आहे. तसेच समाजातील नागरिकांनी आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींना या उपक्रमाची माहिती देऊन त्यांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
समाजातील प्रत्येक घटक सक्षम व स्वावलंबी व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर अनेकांसाठी नवी दिशा देणारे ठरणार आहे.

Comments are closed.