दिवाळी फराळाची चिंता सोडा! लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये मिळणार सर्व काही
घरच्या चवीचा ताजा फराळ, विविध प्रकारचे नमकीन आणि आता दिवाळीचा किराणाही एकाच छताखाली
बहुगुणी डेस्क, वणी : दिवाळीचा सण जवळ येताच घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. मात्र नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामांच्या व्यापात अनेकांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांसाठी लक्ष्मी इंडस्ट्रीजने खास दिवाळी फराळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गणेशपूर येथील मुकुटबन रोडवर, नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये घरच्या चवीचा ताजा फराळ आणि विविध प्रकारचे नमकीन उपलब्ध होणार आहेत.
लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये दिवाळीनिमित्त विशेष फराळाचे ऑर्डर बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये बुंदी लाडू, बालुशाही, चकली, बेसन लाडू, शंकरपाळे (मिठा व खारे), म्हैसूर पाक, काजू कतली यासह विविध मिठाईंचा समावेश आहे. तसेच बेस्ट मिक्सचर, पंचरत्न मिक्सचर, लसूण मिक्सचर, बिकानेरी मिक्सचर, मंगळोरी मिक्सचर, भाकरवडी, पोहे चिवडा, मका चिवडा, शेव, मसाला शेव, दालमोट, गाठीया, पंजाबी तडका यांसह विविध प्रकारचे नमकीनही येथे मिळणार आहेत.
विशेष म्हणजे, लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये तयार होणारा ताजा माल ग्राहकांना थेट फॅक्टरी आउटलेटमधून खरेदी करता येणार आहे. दिवाळी स्पेशल फराळ 320 रुपये किलो, विविध प्रकारचे इंद्रजीत नमकीन 280 रुपये किलो, तर काजू कतली 1000 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. फॅक्टरी आउटलेट असल्याने ग्राहकांना ठोक तसेच किरकोळ दरात खरेदीची सुविधाही मिळणार आहे.

दिवाळीच्या फराळासह दिवाळीचा किराणाही उपलब्ध
दिवाळीच्या फराळासोबतच आता सणासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याची खरेदीही ग्राहकांना एकाच ठिकाणी करता येणार आहे. दिवाळीच्या तयारीसाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरण्याची गरज न पडता लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये फराळासह आवश्यक किराणा साहित्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ आणि किराणा अशा दोन्ही खरेदी एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार असून ग्राहकांचा वेळ आणि धावपळ वाचणार आहे.
गेल्या 5 वर्षांपासून हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या लक्ष्मी इंडस्ट्रीजने यंदाही दिवाळीची विशेष तयारी केली आहे. ग्राहकांना घरबसल्या मोबाईलवरून किंवा थेट फॅक्टरी आउटलेटला भेट देऊन फराळाची ऑर्डर बुक करता येणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फराळ तयार करण्याची धावपळ टाळून ग्राहकांना आवडीचा फराळ सहज उपलब्ध होणार आहे.
- ऑर्डर बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क : लक्ष्मी इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट, मुकुटबन रोड, नायरा पेट्रोल पंपाजवळ, गणेशपूर, वणी. संपर्क : 9420255618, 8087895618. वेळ : सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ई-मेल : laxmiudyog94@gmail.com

Comments are closed.