एकमेकांत हाणामारी, डीजेवाल्या बाबूचे फोडले डोके

जीवे मारण्याची धमकी, दोघांविरोधात गुन्हा दाखल...

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक गोष्टीतून दोन मित्रांनी दुस-या दोन मित्रांना मारहाण केली. एकाने दुस-याच्या डोक्यावर दगड हाणला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरे ही मारहाण करणा-यांवर भीडले. यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात डीजे वादक असलेल्या एका तरुणाचे डोके फुटले. पाटण या गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. या वादात जीवे मारण्याची धमकी दिल्याने डोके फुटलेल्या तरुणाने पोलीस ठाणे गाठत मारहाण करणा-या दोघांविरोधात तक्रार दिली.  

तक्रारीनुसार, अविन श्रीनिवास मेंगणवार (24) रा. लिंगटी ता. झरी येथील रहिवासी असून तो शेती करतो. तसेच तो डीजे (वादक) देखील आहे. शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी त्याचा पाटणमध्ये एका कार्यक्रमात डीजे होता. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तो व त्याच्या मित्र आकाश पंजाबराव संकेवार (24) रा. लिंगटी ता. झरी हे एका मित्राला भेटण्यासाठी गावातल्याच एका कृषी केंद्राजवळ आले. तिथे आरोपी कुंदन विनोद मेश्राम व त्याचा मित्र ब्रह्मानंद गेडाम (दोघेही रा. दुर्भा) हे तिथे झिंगून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ब्रह्मानंद याने अविन व आकाश सोबत वाद घालायला सुरुवात केली. ब्रह्मानंद याने दोघांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. अविन हा समजवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र ब्रह्मानंदचा मित्र कुंदन याने बाजूला पडलेला दगड उचलला व अविनच्या डोक्यात हाणला. अविनचे डोके फुटले. वाद घालणा-या दोघांनी अविन व आकाशला शिविगाळ करीत तुम्हाला एखाद्या दिवशी खतम करतो अशी धमकी दिली.

धमकी देताच अविन व आकाश देखील जोशात आले. आता प्रत्युत्तर म्हणून मार खाणारे दोघे मारहाण करणा-या ब्रह्मानंद व कुंदन याच्यावर तुटून पडले. त्यांनी ब्रह्मानंद व कुंदनची धुलाई केली. दोन गटात हाणामारी सुरु असल्याचे दिसताच गावातील काही लोक मध्ये आले. त्यांनी ही हाणामारी सोडवली. ब्रह्मानंदने जीवे मारण्याची धमकी दिल्याने अविन चांगलाच घाबरला. त्याने पाटण पोलीस ठाणे गाठत ब्रह्मानंद व त्याचा मित्र कुंदन विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 352 व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.      

छोरिया टाऊनशिपमध्ये 2 BHK फ्लॅट विकणे आहे

Comments are closed.