गुरुनगर येथील ज्ञानेश्वर अंबुरे यांचे निधन

मुलाच्या निधनानंतर अवघ्या 20 दिवसातच वडिलांचेही निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील गुरुनगर, विराणी टॉकीज मागे येथील रहिवासी ज्ञानेश्वर भानुदास अंबुरे यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. ते वेकोलि रुग्णालय माजरी येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलगा देवेंद्र अंबुरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. या दु:खद घटनेचा मोठा मानसिक आघात ज्ञानेश्वर अंबुरे यांना झाला होता.  चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आज बुधवार, दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाच महिन्यात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता राहते घर गुरुनगर येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुन, जावई, नातवंड, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.

Comments are closed.