ओपीडीच्या वेळेत सर्व वैधकीय अधिकाऱ्यांनी हजर राहावे

मनसे रुग्णसेवा केंद्र पदाधिकाऱ्यांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवार ते शनिवार सुरु राहणाऱ्या बाह्य रुग्ण विभाग (OPD) च्या वेळेत रुग्णालयातील सर्व वैधकीय अधिकाऱ्यांनी हजर राहावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संचालित मनसे रुग्ण सेवा केंद्रातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत वैधकीय अधीक्षक व जिल्हा चिकित्सा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वणी ग्रामीण रुग्णालयात दर सोमवार ते शनिवार सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणी केली जाते. ओपीडीच्या वेळात अपघातग्रस्त, विषप्रशान किंवा अत्यावश्यक रुग्ण दाखल झाल्यास चिकित्सकांना ओपोडी सोडून जावं लागतात. त्यामुळे वणी शहर व बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांना तासंतास ताटकळत राहावं लागते.

येत्या आठ दिवसात ग्रामीण रुग्णालयात नेमणूक झालेले सर्व वैधकीय अधिकारी बाह्यरुग्ण तपासणीस हजर न राहिल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मनसे रुग्णसेवा केंद्र कार्याध्यक्ष आजीद शेख, लकी सोमकुंवर, मयूर मेहता, संकेत पारखी, अमोल मसेवार, राहुल तावडे उपस्थित होते.

Comments are closed.