पुरुषोत्तम नवघरे, वणी:वणी शहर हे कल्पकता, सृजनशीलता आणि लोकोपयोगी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. हाच वारसा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वणी शाखेनंही कायम राखला. 1 जुलैला डॉक्टर्स डे सर्वच ठिकाणी अनेक प्रकारे साजरा होतो. मात्र आय.एम.ए.च्या वणी शाखेने त्याला एक भव्यदिव्य स्वरूप दिले. वैद्यकीय तंत्रज्ञान अपडेट करण्यासोबतच वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा असे अनेक विविध उपक्रम आयएमएने राबवलेत. समाजोपयोगी कार्यांसाठी एका सहभागृहाचे लोकार्पण केले. डॉक्टर्स डे साजरा करण्याचा असा अभिनव आदर्श महाराष्ट्रातील सर्व शाखांनी घ्यावा. असे प्रतिपादन लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ हरीश वरभे यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत स्टाफसाठी कार्यशाळा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वणी शाखेने डॉक्टर्स डे साठी अनेक कार्यक्रमांची आखणी केली. त्यात विविध उपक्रम घेत डॉक्टर्स डे साजरा केला. त्याप्रसंगी लाईफलाईन ब्लड बॅंकेचे संचालक डॉ. हरीष वरभे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र IMA चे पदाधिकारी डॉ. मंगेश गुलवाडे होते. वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, तहसिलदार निखिल धुळधर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार यांनी विविध उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन
पुढे बोलताना डॉक्टर हरीश वरभे म्हणालेत, की आयएमए वणी शाखेने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर्स व संबंधितांसह सामान्य रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवत डॉक्टर्स डे साजरा केला. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा आणि अन्य उपक्रम घेऊन नव्या पिढीला आणि नागरिकांनादेखील या सहभागी करून घेतले. शहराला दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. म्हणून सकाळी ग्रामीण रुग्णालयात आयएमए वणी शाखेने वृक्षारोपण केले. आयएमए वणी शाखा विविध पातळ्यावर काम करत आहे. त्यासाठीच म्हणून एका सभागृहाची गरज होती. डॉ.महेंद्र लोढा यांनी त्यासाठी जागा दिली. त्यावर झालेल्या आयएमएच्या सभागृहाचे लोकार्पण झाले. तिथून आता आयएमएच्या अनेक लोकोपयोगी कामांनी गती मिळेल असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
डॉ. शिरीष कुमरवार, डॉ. सुरभी कुमरवार यांच्यासह अनेकांचे रक्तदान
आयएमए वणी शाखा ही प्रशासनासोबत विविध जनहितांच्या उपक्रमांत सहभागासाठी तत्पर आहे. आता या उपक्रमांचा आवाका वाढण्याचा मानस वणी शाखेनं बोलून दाखवला. रक्तदान ही काळाची गरज आहे. एकाचं रक्तदान हे अनेकांचे प्राण वाचवू शकतात. म्हणूनच यावेळी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं. डॉ.शिरीष कुमरवार आणि डॉ. सुरभी कुमरवार यांनी रक्तदान करत शिबिराचा आरंभ केला. यावेळी विविध डॉक्टरांच्या परिवारातील सदस्य, औषधी विक्रेते, नगरपालिका आणि महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. ही रक्तदात्यांची संख्या 50 हून अधिक होती, हे विशेष.
पोस्टर प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली
जागतिक आरोग्य संघटना WHO ची 2025 ची थीम “निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य” (Healthy Beginnings, Hopeful Futures) आहे. या विषयावर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा झाली. या पोस्टर्सचे प्रदर्शन हॉलमध्ये लावण्यात आले. तज्ज्ञ परीक्षकांच्या निष्कर्षांवरून प्रतिभावंतांचा गौरव झाला. या स्पर्धेत जनता विद्यालयाची दीक्षा चावरिया प्रथम आली. रिधिमा हरिभाऊ पुंड ही लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थनी द्वितीय स्थानावर आली. तर साची खोब्रागडे या स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीनं तृतिय क्रमांक पटकवला.
पोस्टर स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी केली आरोग्यविषयक जनजागृती
वैद्यकिय तंत्रज्ञानही दिवसेंदिवस उन्नत होत आहे. डॉक्टर्स, नर्सेंस आणि संबंधित यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांचे वैज्ञकिय ज्ञान अपडेट व्हावे म्हणून डॉ. हरीश वर्भे यांनी मार्गदर्शन केले. रक्त संक्रमन ही एक महत्त्वाची व जबाबदारीची प्रक्रिया आहे. त्यामुळे नर्स व मेडिकल स्टाफसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन यावर नव्या IMA हॉल येथे आधुनिक कार्यशाळा झाली. तर रात्रीच्या सत्रात IMA सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन लाईफलाईन ब्लड बॅंकेचे संचालक डॉ. हरीष वरभे यांनी केले.
आय एम ए वणी शाखेच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा
डॉ. महेंद्र लोढा यांच्या संकल्पनेतून आणि दातृत्वातून सभागृह साकारले. त्यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. प्रास्ताविक भूमिका IMA वणीचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार यांनी मांडली सचिव डॉ. संकेत अलोणे यांनी सर्वांचे आभार मानलेत. यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. सुनील जुमनाके, सहसचिव डॉ. स्वप्निल गोहोकर आणि पदाधिकारी आणि सदस्यांनी तथा इंडियन डेंटल असोसिएशननेही विशेष सहकार्य केले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.