बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला

वणीतील सदाशिवनगर येथील थरारक घटना

बहुगुणी डेस्क, वणी: येथील सदाशिवनगर मध्ये एका मोकाट कुत्र्याने 9 वर्षीय बालकावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिक धावून आल्याने व बालकाने हिमतीने लढा दिल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी पावनेसात वाजताच्या सुमारास घडली असून एका सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. याचा थरारक व्हिडिओ बुधवारी रात्रीपासून चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून वणीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

व्हिडीओ मध्ये जिसत आहे की एक बालक (श्रीजीत श्रीकांत कालर) हा सोसायटीच्या मोकळ्या जागेत सायकल चालवत होता. त्या परिसरातील नागरिकही ये-जा करीत होते. हा कुत्रा तिथेच होता. बालक थोडा समोर गेला. त्याने आपली सायकल वळवली. तोच त्या कुत्र्याने सायकल चालवणा-या बालकावर हल्ला केला. दरम्यान त्याच्या बाजूलाच असलेला एक बालक घाबरून लगेच तिथून निघून गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

श्रीजीतच्या आवाजावरून काहीतरी चुकीचं घडत आहे, हे नागरिकांच्या लक्ष्यात आलं. दरम्यान काही लोक घरातून बाहेर आलेत. त्यांनी आरडाओरड करीत त्या कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच बालकाने पण कुत्र्याच्या तावडीतून सुटण्यासाठी हिमतीने लढा दिला. अखेर सुदैवाने बालकाने कुत्र्याच्या तावडीतून आपली सुटका केली. मात्र या थरारक झुंजीत कुत्र्याने अनेक चावे श्रीजीतला घेतले. यावेळी कुत्र्याची आक्रमकता बघता, मोठी दुर्घटना होण्याचे टळले, असे बोलले जात आहे. सध्या श्रीजीतवर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा हैदोस
या घटनेमुळे शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नये. त्यावर ही भटकी कुत्री जगतात. तसेच, भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना सर्वत्र नियमित घडत आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. हल्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर वणी नगर परिषद काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाहा हा थरारक व्हिडीओ 

Comments are closed.