बियर पिल्याने मुतखडा जातो का? मुतखड्यात बियर किती फायदेशीर?

वाचा सुप्रसिद्ध मुत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित चिद्दरवार यांचा ब्लॉग

एकदा एक तरुण पेशन्ट क्लिनिकमध्ये आला होता. वजन वाढलेले व चेह-यावर सुरकुत्या आलेल्या होत्या. त्याची तक्रार होती की मुतखडा असल्याने रोज एक बियर पितो. पण मुतखड्यापासून अद्यापही आराम मिळालेला नाही. पेशन्टची तक्रार ऐकून फार आश्चर्य वाटले नाही. कारण केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातच मुतखडा असल्यास बियर पिण्याबाबत हेच म्हणणे आहे. तर आज आपण मुतखडा झाल्यावर बिअर पिल्यास किती फायदा होतो. यास मुतखड्याचा संपूर्ण बायोडाटाच बाहेर काढू. मुतखडा का होतो? कसा होतो? मुतखडा झाला कसे ओळखायचे? त्यावर उपाय काय, घरगुती उपाय काय, ऑपरेशन करणे गरजेचेच आहे का, विना ऑपरेशन मुतखडा कसा बरा होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बियर पिल्याने मुतखडा बरा होता का? किंवा बियर पिल्याने मुतखडा होत नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला मुतखड्याचा त्रास असेल किंवा नसेल तरी पूर्ण आर्टिकल नक्की वाचा… यात मी तुम्हाला मुतखडा होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय देखील सांगणार आहे, जे तुम्हाला मुतखडा होण्यापासून वाचवेल.

मुतखडा म्हणजे काय?
मुतखडा ज्याला स्टँडर्ड भाषेत किंवा इंग्रजीत आपण किडनी स्टोन म्हणतो. आपल्या शरीरातील वेस्ट (टाकावू) लखवीद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जातात. हे सर्व काम किडनी पाण्याची मदत घेऊन करते. जे काही टाकाऊ पदार्थ असेल ते पाण्यात विरघळून, फिल्टर करून बाहेर टाकले जाते. पण त्याला फिल्टर करण्यासाठी विरघळवण्यासाठी जर किडनीला पाणी कमी पडले तर लघवीत वेस्ट नीट विरघळत नाही. अशा लघवीला कॉन्सन्ट्रेड किंवा ऍसेटिक लघवी म्हटली जाते. पाणी कमी झाल्याने जेव्हा लघवी कॉन्सन्ट्रेड होते, तेव्हा लघवीच्या मार्गात (मूत्रपिंडात) न विरघळलेले स्फटिकजन्य (क्रिस्टल) पदार्थ एका ठिकाणी जमा होतो. यालाच मुतखडा म्हटले जाते. आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जसे पाण्यात एखादी वस्तू विरघळायला टाकली आणि पाणी कमी झाले तर ती वस्तू कमी विरघळते व तळाशी जमा होते. अगदी तसेच मुतखड्याचे आहे.

मुतखडा का व कुणाला होतो?
पाण्याची कमतरता हे मुतखड्याचे सर्वांत मोठे आणि प्रमुख कारण आहे. अति शारीरिक श्रम किंवा अती व्यायाम हे देखील एक कारण आहे. अती श्रम किंवा व्यायामाने शरीरातील पाणी कमी होते. जर शरीराला पाणी मिळाले नाही तर मुतखड्याचा धोका असतो. अती मांसाहार, गरजेपेक्षा जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब, अधिक मीठ खाणे, नेहमी युरीन इनफेक्शन होणे, घरी कुणाला आधी मुतखडा असल्यास (अनुवांशिता), रक्तात युरीक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यास, य़ासह काही शारीरिक विकार, काही रोगांवर आपली औषधी सुरु असते किंवा काही सप्लीमेंट्स सुरु असते याने देखील मुतखडा होतो. पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक असते तर ज्या महिला कमी पाणी पितात. लघवी तुंबवून ठेवतात. अशा महिलांना देखील धोका असतो. यासह गर्भवती महिलांनाही याचा धोका असतो. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्याने मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.

किंडनी स्टोनचे प्रकार व किती मोठा असतो 
अनेक प्रकारचे मुतखडे असतात. मात्र यातील मुख्य मुतखडा म्हणजे कॅल्शियम ऑक्सलेटचा मुतखडा. कॅल्शियमपासून कॅल्शियम ऍक्सलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात. अधिक मीठ खाणारे पण पाणी कमी पिणे यांना या टाईपचा किडनी स्टोन होतो. जे पुरुष अधिक प्रोटिन्स युक्त आहार घेतात, मात्र पुरेसे पाणी घेत नाही. त्यांच्या शरीरामुळे युरीक ऍसिड वाढते अशा लोकांमध्ये युरीक ऍसिडचा मुतखडा तयार होतो. तर महिलांमध्ये स्ट्रुव्हाइट स्टोन्स हा मुतखडा दिसून येतो. सिस्टिन स्टोन्स हा अनुवांशिक विकारामुळे होतो. मुतखडा हा वाळूच्या एका दाण्यापासून ते गोल्फच्या एका बॉल इतका मोठा देखील असू शकतो. शिवाय हा खडा आकार देखील बदलू शकतो.

किडनी स्टोन टाळण्यासाठी काय करावे?
किडनी स्टोन टाळण्यासाठी शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. दिवसातून किमान 8-12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. अधिक पिले तरी हरकत नाही. (आता तर पाणी पिण्याची आठवण करून देणारे विविध ऍप्स देखील आहेत. ते ऍप तु्म्ही डाउनलोड करू शकता.) आहारात सोडियम म्हणजे मिठाचे प्रमाण कमी करणे, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड खाणे टाळा, सकस आघार घ्या. फळे आणि भाजी यांचे अधिकाधिक सेवन करा, जास्त ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे (बीट, पालक, ग्रीन टी, बदाम, काजू, बटाटे, सोयाबिन, चॉकलेट) याचे सेवन मर्यादित करा, व्हिटॅमिन सी असलेले फळे खा. रोज लिंबू पाणी प्या. अती मांसाहार टाळा, वजन नियंत्रणात ठेवा. तसेच लघवी तुंबून ठेवू नका. लघवी आली तर लगेच करा. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. प्राथमिक लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, इत्यादी गोष्टी केल्यास मुतखडा हा तुमच्यापासून दूर राहील. (जाधव क्लिनिक नांदेपेरा रोड, वणी येथे रुग्णांना वैद्यकीय सल्ला तसेच उपचार घेता येईल.)

बियर पिल्याने मुतखडा जातो का?
आता येऊ महत्त्वाच्या विषयाकडे… ज्यासाठी अधिकाधिक लोक हा ब्लॉक वाचण्यासाठी आलेत. बियर पिल्याने मुतखडा जातो का? आणि जगभरात असे का म्हटले जाते? (असे केवळ लोकच म्हणतात डॉक्टर नाही !) तर बियर ही बॉडी डीहायड्रेड करते. बियर पिल्यानंतर वारंवार लघवी होते. त्यामुळे वेस्ट लघवीद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. ही एकच गोष्ट मुतखड्याबाबत बियरच्या फेव्हरमध्ये आहे. पण मूत्रमार्गाची वेस्ट बाहेर टाकण्याची कॅपिसिटीच 3 मीमीची आहे. त्यामुळे 5 मीमी पेक्षा मोठा स्टोन शरीरातून बाहेर पडू शकत नाही. त्यापेक्षा लहान स्टोन जर असेल, तर तो असाच अधिकाधिक व सारखे पाणी पिऊन बाहेर निघेल. त्यासाठी बियर पिण्याची गरज नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे बियरमुळे वारंवार लघवी होत असली तरी बियरमध्ये किडनी स्टोन होणारे अनेक घटकं आहेत. त्यामुळे उलट बियरमुळे किडनीस्टोन वाढतात. यासोबतच बियर पिण्याचा लिव्हरवर उलटा परिणाम होतो. सातत्याने बियर पिल्यास फॅटी लिव्हर होते. परिणामी लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो. मद्यपानामुळे वजन वाढते. वजन वाढल्याने अधिकाधिक आजार होतात. त्यामुळे डॉक्टर कधीही मुतखड्यात बियर पिण्याचा सल्ला देत नाही. त्यामुळे तुम्हीही बियर पिण्यासाठी विविध कारणं शोधू नका. मुतखड्यात तर अजिबादच नाही. उलट बियर किंवा मद्यपानामुळे मुतखडा वाढू शकतो. बियर, दारू ऐवजी पाणी प्या… रिझल्ट अधिक चांगला मिळेल.

जर तुम्हाला देखील मुतखडा असेल किंवा त्रास नुकताच सुरु झाला असेल तर वणीतील नांदेपेरा रोड येथील जाधव क्लिनिक येथे एकदा भेट द्या. जर तुम्हाला असलेला मुतखडा प्राथमिक लेव्हलला असेल तर तो काही औषधी घेऊन लगेच बरा करता येईल. जर मुतखड्याचा त्रास वाढलेला असेल तर त्यावर योग्य तो उपचार करता येईल.

सर्जन डॉ. अमित अतुल चिद्दरवार (M.BBS, M.S. (Gerneral Surgery) M. Ch (Urology)) हे चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ आहेत. नवीव वर्षांपासून ते दर रविवारी वणीतील जाधव सर्जिकल क्लिनिक येथे रुग्णसेवा देत आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना मूत्र रोग याबाबत वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे. त्यांनारविवारी दुपारी 1 ते 4या वेळी डॉक्टर चिद्दरवार यांना भेटता येईल.

पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9545693417
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा.

 

Comments are closed.