सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची आज वणीत व्हिजिट

प्राची-माधव मेडिकल येथे करणार रुग्णांची तपासणी

0

विवेक तोटेवार, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची आज रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी वणीतील यवतमाळ रोड स्थित प्राची-माधव मेडिकल येथे व्हिजिट आहे. परिसरातील लकवा, फिट, डोकेदुखी, अर्धडोकेदुखी, चक्कर, मायग्रेन, स्मृतीभ्रंश, हातपाय थरथर कापणे, सॉन्डेलिसिस, पारकिनसन, स्ट्रोक, हातापायांना मुंग्या येणे इत्यादी रोगांसंबंधी रुग्णांची ते तपासणी करणार आहेत.

डॉ. प्रतिक शेखऱ उत्तरवार हे मुळचे वणीचे असून सध्या ते नागपूर येथील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये न्यूरोफिजिशियन (मेंदूरोगतज्ज्ञ) म्हणून प्रॅक्टिस करतात. परिसरातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्यांची वणी येथील प्राची-माधव मेडिकल येथे महिन्याच्या पहिल्या व तिस-या रविवारी व्हिजिट असते. रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी त्यांची रुग्णांच्या तपासणीसाठी व्हिजिट आहे. 11 ते 5 या दरम्यान ते मेंदूरोगाशी संबंधीत रुग्णांची तपासणी करणार आहेत.

परिसरात न्युरोफिजिशियन नसल्याने आपल्या परिसरातील रुग्णांना नागपूर येथे जाऊन उपचार करावा लागतो. यात रुग्णांचा वेळ तर जातोच शिवाय यात जाण्यायेण्याचा अऩावश्यक खर्चही सहन करावा लागतो. मात्र वणीचे सुपुत्र म्हणून परिसरातील रुग्णांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी डॉ. प्रतिक उत्तरवार आपल्या शहरात वैद्यकीय सेवा देतात. तरी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मेंदूरोगाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी या रविवारी जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूलच्या मागे प्राची-माधव मेडिकल येथे भेट द्यावी.
– मनीष निमेकर, प्राची-माधव मेडिकल वणी

डॉ. प्रतिक उत्तरवार हे MBBS असून त्यानंतर त्यांनी देशातील नामांकीत संस्था एम्स दिल्ली येथून DM Neurolgy ही पदवृत्तर पदविका घेतली आहे. सध्या ते नागपूर येथील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कंसल्टन्ट न्युरोफिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतात.

अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी संपर्क: 8857966094

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.