रहदारीच्या रस्त्यावर त्याने प्राशन केले कीटकनाशक, तडफडत असताना….

विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू
जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मेंढोळी येथे विजेचा जबर धक्का लागून एका इसमाचा मृत्यू झाला. सुनील पुरुषोत्तम ढवस (40) रा. मेंढोळी ता. वणी असे मृत युवकाचे नाव आहे. गावातील संजय जीवतोडे यांच्या शेतात विद्युत खांबावर चढून काम करीत असताना त्यांना विद्युत प्रवाहित तारांचा स्पर्श झाला. त्याचा त्यांना जोरदार शॉक बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. बुधवार 12 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेबाबत शिरपूर पोलीस तपास करत आहे.

किटकनाशक प्राशन करून युवकाची आत्महत्या
वणी पोलीस ठाणे अंतर्गत मजरा गावात एका 23 वर्षीय युवकाने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. शरद मार्कंडी महारतळे रा. मजरा, ता. वणी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी वणी येथून किटकनाशक खरेदी करून ते सायंकाळी गावाकडे जात होते. मात्र ते सोयाबीन फॅक्टरी जवळ थांबले व तिथे त्यांनी किटकनाशक प्राशन केले. किटकनाशक प्राशन करून तडफडत असताना या मार्गावरून जाणाऱ्या काही लोकांची त्यांच्यावर नजर पडले. लोकांनी त्याला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वणी पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

लालगुड्याचे सरपंच चालखुरे यांचे निधन
वणी शहरालगत असलेले लालगुडा गावाचे सरपंच धनराज चालखुरे यांचा नागपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना डोक्यामध्ये वेदना जाणवली. त्यामुळे चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे सांगितले. त्यांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र बुधवारी दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर आज गुरुवारी दिनांक 13 जुलै रोजी लालगुडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी आहे.

Comments are closed.