बोटोणी ग्रामपंचायतीमध्ये ई सेवा-सुविधा केंद्र सुरू

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इ दाखले मिळणार एकाच छताखाली

0

जयप्रकाश वनकर, बोटोणी: प्रशासकिय दाखले आणि सर्टफिकेट जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या हेतुने बोटोणी ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केन्द्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना पॅन कार्ड, आधारकार्ड सोबतच विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत आवश्यक दाखले (G2C ) तसेच इतर व्यावसाईक सेवा आता ग्रामपंचायतीमध्ये मिळणार आहे. या सेवेमुळे नागरिकांची वेळेचा त्रास तर कमी होणार आहे सोबतच आर्थिक भुर्दंडही कमी होणार आहे.

शासनाच्या म्हत्वाकांकशी इ पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायती मधील सर्व कारभार संगनिकृत करून पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने (G2G) तसेच ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता निर्माण व्हावी या उद्देशाने २०११ साली निर्माण झालेल्या संग्राम प्रकल्पाचे रुपांतर आता आपले सरकार सेवा केंद्रात झाले आहे. या अगोदर या केन्द्रामार्फत ग्रामपंचायत स्तरावरील तसेच शासन योजनाविषयी सेवा-सुविधा मिळत असत परंतु १ नोव्हेंबर २०१७ पासुन या केंद्रामार्फत आता गावातील नागरिकांना महसुल विभागासह शासनाच्या सर्व विभागातील सेवा-सुविधा तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड यासह शासनाच्या विविध योजना आता गावातच ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

शासनाच्या सर्व विभागातील 400+ ऑनलाईन सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने आता गावकर्‍यांचा वेळ,खर्च व अधिकचे श्रम वाचणार आहेत. गावकरी शहरात या सेवा-सुविधा मिळवण्यासाठी जात असत तेव्हा त्याना संबधित सेवा बद्दल, माहिती नसल्याने त्याचा गोधंळ होत असे. सोबतच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता गावकर्‍यांना आता या सेवा-सुविधा गावातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत संगणक परिचालक यांचेकडे मिळणार असल्याने गावातील नागरिकांना यासह सर्व स्तरातुन शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.