सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जनतेला भरमसाठ बिलाचा व भोंगळ कारभाराचा परिचय देणाऱ्या वीज वितरण कंपनी कडून वीज ग्राहकांना महिन्याकाठी मिळणारा आर्थिक भुर्दंडच्या शॉकसह आता वीज बिल न मिळण्याचा शॉकही सहन करावा लागतोय. वीज महावितरणा कडून तालुक्यातील वीज ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक आपल्या वीज मीटर सोबत जोडून ऑन-लाईन वीज बिल व रिडींग पाहण्याचा कयास करीत आहेत. मात्र वीज वितरण विभागाकडून नेमणूक केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग न घेण्याचा फंडा सुरू केल्याने वीज ग्राहकांना नाकी नऊ आणून सोडले आहेत.
यात वीज ग्राहकासह महावितरणच्या डोळ्यात तेल घालण्याचे काम सुरू केल्याचे चित्र सध्या तालुक्यातील गावागावात स्पष्ट होत आहेत. तर वीज बिल घरपोच न देता किराणा वा पान टपरीवर टाकून निघून जात असल्याची ओरड आहेत. परिणामी वीज ग्राहकांना वीज बिलाप्रति मानसिक त्रास होत आहेत. मांगली येथे पानटपरीवर विजबिलाचा गठ्ठा ठेऊन दिला जातो यातील बहुतांश विजबिल हे जनतेपर्यंत पोहचत नसल्याने जनतेला बिल भरण्यास मोठी अडचण निर्माण होत असून भरलेले बिल दुसऱ्या महिन्यात वाढ होऊन येत असल्याने जनतेला झरी कार्यालयाच्या पायऱ्या दर महिन्याला घासावे लागत आहे.
कंत्राटदारांच्या चुकीचे फळ जनता भोगत असून सदर कंत्राटदाराकडून काम काढून दुसऱ्याकडे देण्याची ओरड जनतेकडून होत आहे. यापूर्वी राजूर ( गोटा ) येथीलही गावकऱ्यांनी कंत्राटदाराकडून वीजबिल मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती.सदर कंत्राटदार वणी येथील असून तालुक्यातील काही खाजगी मूल ठेऊन वीजबिल वाटपाचे काम करतो परंतु खाजगी मूळ वीजबिल वाटप करतात की नाही यावर लक्ष नसून कंत्राटदार उंटावरून शेळ्या हकताना दिसत आहे.
अशा कामचलाऊ खाजगी कंत्राटदार कडून वीज ग्राहकांना वीज बिल मिळत नसल्याची ओरड तालुक्यात वाढली आहेत. परंतु तालुका वीज वितरण कार्यालयांकडून या भोंगळ व निष्काळजी कंत्राटदारांची पाठराखण करून वीज ग्राहकांची पिळवणूक करीत असल्याचे यावरून दिसून येत आहेत. तर वीज बिला संबंधित तक्रारी घेऊन दररोज नगण्य वीज ग्राहक झरी,मुकुटबन वीज कार्यालयात गर्दी वाढवीत आहेत.