ग्रामीण रुग्णालय अंधारात, अपु-या व्यवस्थेने निघाले वाभाडे
प्रसूतीसाठी आलेल्या व प्रसूती झालेल्या मातांचे हाल
जब्बार चीनी, वणी: सध्या सर्वात चर्चचा विषय ठरलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचा कळस बघायला मिळाला. आज शुक्रवारी संध्याकाळी शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जनरेटर नसल्याने नुकत्याच प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आणि नुकतीच प्रसूती झालेल्या मातांसह नवजात बालकांंचे चांगलेच हाल झाले. यातच मृतकाचे शवविच्छेदन सुद्धा थांबले.
सध्या वणी ग्रामीण रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराची जणू शृंखला सुरू आहे. इथला एक नव्हे तर अनेक ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याने लोकप्रतिनिधी सध्या काय करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संध्याकाळी वणीत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यातच लाईटही गुल झाली. परिणामी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची चांगलीच दमछाक झाली. इतकेच नव्हे प्रसूती झालेल्या माता व बाळांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. संपूर्ण दवाखाना अंधारात राहिला. रुग्णालयात असलेले जनरेटर सुद्धा सुरू झाले नाही. वृत्तलिहेपर्यंत रुग्णालय अंधारात होते.
सध्या ग्रामीण रुग्णालयाचे अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आले असतानाही इथल्या डॉक्टरांना अभय मिळते तरी कसे असा सवाल उपस्थित होत आहे.