भालर व मुकुटबन येथे भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर

विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन... 18 नोव्हेंबर रोजी भालर तर 19 नोव्हे. रोजी मुकुटबन येथे शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत भालर येथील जिल्हा परिषद शाळेत हे शिबिर होणार असून रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथे बस स्टँड चौक येथील श्री राज राजेश्वर शीव मंदिरात हे शिबिर होणार आहे. सदर शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामची टीम आरोग्य सेवा देणार आहे. सदर शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाउंडेशन व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे.

शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा – विजय चोरडिया
गेल्या काही वर्षांपासून परिसरात नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधी, तसेच चष्मा दिला जाणार आहे. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवून मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केला जाणार आहे. या शिबिराचा गरजूंनी जरूर लाभ घ्यावा.
– विजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते

या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणी न झालेल्या रुग्णांना वेळेवर नाव नोंदणी केली जाईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क-
पवन एकरे – 9890697718
विशाल दुधबळे – 9673751678
रोहन पारखी – 9823317959
संतोष लक्षेट्टीवार – 899927912
प्रमोद – 9823378529

Comments are closed.