शासनानं दडपलं शेतकरी आंदोलन

लोकशाही मार्गानं आंदोलन करणा-या आंदोलनकर्त्यांना केलं स्थानबद्ध

0 424

वणी: शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी 14 जुलैला शेतकऱ्यांचं यवतमाळ येथे शव यात्रा आंदोलन होतं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी यवतमाळला जाणार होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना जागीच स्थानबद्ध करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. शुक्रवारी वणीतील संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विदर्भ राज्य चळवळीचे कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत असतांना पोलीस यंत्रणेने त्यांना स्थानिक विश्राम गृहात घेतले आणि आंदोलनात जाण्यास मज्जाव करीत स्थानबद्ध केले.

फडणवीस सरकारनं शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र सदर घोषणा हवेतच विरघळून गेली. कर्जमाफी देण्याची मुदत पण निघून गेली. सरकारने वेळकाढू धोरण अवलंबलं. परिणामी राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन दडपशाही मार्गाने गुंडाळले. या प्रकाराचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येतोय.

या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, दिलीप भोयर,मिलिंद पाटील,अमोल टोंगे,दत्ता डोहे,चंद्रकांत वैद्य, अजय धोबे,उत्तम पाचभाई, बालाजी काकडे,नारायण काकडे,प्रहार चे अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज, आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.

Comments
Loading...