अल्पभूधारक युवा शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतातच संपवली जीवनयात्रा, कोना येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोना एका युवा शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस ली. गणेश जगन्नाथ तुराणकर (37) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश हा अल्पभूधारक असल्याची माहिती आहे. तो शनिवारी शेतात गेला. मात्र घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय व परिचित शेतात गेले असता गणेशने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघड झाले. गणेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,  मुलगी असा आप्तपरिवार आहे. गणेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Comments are closed.