विवेक तोटेवार, वणी: डोक्यावर असलेला कर्जाचा भार त्याला असह्य झाला. मग अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने मारेगाव तालुक्यातील केगाव येथे स्वतःच्याच शेतात मोनोसील हे विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (35) असे त्या युवकाचे नाव होते.
ही घटना मंगळवारी सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पवन हा अल्पभूधारक होता. त्याच्याकडे जेमतेम तीन एकर शेती होती. त्यावर तो संपूर्ण कुटुंबाचा डोलारा सांभाळत होता.
त्यातच त्याला निसर्गाने दगा दिला. त्याच्यावर मारेगाव येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे तब्बल चार लाखांचे आणि खाजगीदेखील कर्ज होते. डोक्यावरील कर्ज वाढले. त्यात त्याने आपली जीवनयात्रा संपवली.
Comments are closed.