ग्रामपंचायतकडे बोनस येऊनही रकमेचे वाटप नाही

बोटोणी येथील 4 मजुरांचे तेंदूपत्ता बोनससाठी आमरण उपोषण

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या पाच वर्षांपासून तेंदूपत्ता बोनसचे पैसे ग्रामपंचायतकडे जमा झालेले आहे. मात्र वारंवार मागणी करूनही या बोनसचे वाटप होत नसल्याने बोटोणी येथील 4 तेंदूपत्ता मजुरांनी आज मंगळवारी दिनांक 21 सप्टेंबर पासून मारेगाव पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे.
       
सन 2015 पासून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरूपात वाटण्यासाठी लाखो रुपयांचा निधी बोटोणी ग्रामपंचायतच्या खात्यात जमा आहे. या तेंदूपत्ता बोनस रकमेचे ग्रामपंचायतने मजुरांना वाटप करावे यासाठी अनेकदा या मजुरांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. बोनस रकमेचे वाटप करण्यासंबंधी वरिष्ठांनाही निवेदन दिली. परंतु ग्रामपंचायत ने बोनस चे वाटप केले नाही
     
त्यामुळे शेवटी बोटोनी येथील दिवाकर आस्वले, केशव भसारकर, भास्कर सिडाम, केशव खंडाळकर या मजुरांनी आजपासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Comments are closed.