मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा

कान्हाळगाव शेतशिवारातील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: शुल्लक वादावरून केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी बापलेकाला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी हा निर्णय दिला आहे. अनिल देवराव आस्वले व देवराव शामराव आस्वले रा. कोलगाव ता. मारेगाव जि यवतमाळ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांचे नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी हे 17 जुलै 2016 रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आपल्या मित्रांसह कान्हाळगाव शिवारातील शेतात दुचाकीने गेला होता. परत येत असताना कोलगाव येथील वांडरे यांच्या शेताजवळ नामे फिर्यादीच्या मोटारसायकलला आरोपी अनिलने ठोस मारली होती. फिर्यादीने ठोस का मारली याबाबत आरोपीला विचारणा केली होती.

त्यावरून आरोपी अनिलने फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी अनिल एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या वडिलांनाही फोन करून बोलावले. त्याचे वडील देवराव हे तुतारीची काठी घेऊन घटनास्थळी आला व त्याने देखील फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. यात फिर्यादी व त्याचे मित्र जखमी झाले होते.

फिर्यादीने याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. त्यावरून पोलिसांनी आरोपी बापलेकाविरोधात भादंविच्या कलम ३२४, २७९, २९४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाचा नापोका निलेश वाढई यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते.

प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, डॉक्टर व तपास अधिकारी यांच्यासह सात साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षीदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत 5 हजारांचा दंड सुनावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी डी कपुर व पोलीस स्टेशन मारेगावचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी म्हणून ढुमणे यांनी काम पाहीले.

हे देखील वाचा:

अनिल ताजने झाले चिखलगावचे उपसरपंच

लाठीकाठीचे ‘वस्ताद’ जनार्धन भरणे यांचे वृद्धापकाळाने निधन

Comments are closed.