विवेक तोटेवार, वणी: नुकताच दहावीचा निकाल लागला. त्यात स्थानिक संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलने विक्रमी यश मिळवलं. या सर्व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थांना यातून प्रेरणा मिळेल. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दिशा मिळतील असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. यावर्षी शाळेतून आयशा मल्लारेड्डी उटलावार हिने 92.60 टक्के गुण घेत शाळेतून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. प्रगती विजय कठाणे हिने 91 टक्के गुण घेत शाळेतून द्वितीय आली. तर गायत्री नरेंद्र पारोधी हिने 89 टक्के गुण घेत तृतीय आली. सोबतच आस्था भास्कर काळे हिने 85.80 टक्के व अंकिता मोहन कायरकर हिने 85.60 टक्के गुण घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे. सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रमेश येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सहसचिव तानाजी पाऊणकर, संचालक विलास क्षीरसागर, शैलेश आडपावार, मुख्याध्यापिका सीमा कुरेकर, उपमुख्याध्यापक प्रसन्न बटले, पर्यवेक्षिका शोभा गंधारे उपस्थित होते. अध्यक्ष रमेश येरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर शैलेश आडपावार यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.

निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.