रंगनाथ नगर येथे दोन गटात राडा

दोन्ही गटातील 7 जणविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरातील नवीन अग्निशामक बिल्डिंगजवळ दोन गटात क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन मारहाण झाली. सोमवारी 18 ऑक्टो. रोजी रात्री घडलेल्या घटनेची दोन्ही गटांनी एकमेकाविरुदद वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तक्रारीवरून पोलिसानी दोन्ही गटातील 7 जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केले आहे.

फिर्यादी आरती गणेश पुसनाके (29) रा, रंगनाथ नगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार राम दशरथ देठे (35), गौतम झाडे (40), समीर मेश्राम (30), गोपाल झाडे (32) सर्व रा. रंगनाथ नगर यांनी सोमवारी रात्री 7.30 वाजता दरम्यान तिचे पती गणेश पुसनाके याला उसणे पैशांचे वादावरून लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी केले. फिर्यादवरुन पोलिसानी वरील सर्व आरोपीवर 324,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला.

तर विरोधी गटातील फिर्यादी तेजस्विनी गोपाल झाडे (26), रा. रंगनाथ नगर वणी यांनी गैरअर्जदार गणेश अरविन्द पुसनाके (36), अजय राऊत (23) आणि राधा रवी गुप्ता (28) हिने भासऱ्यासोबत वाद करून लाठीने तसेच लाथा बुक्कयाने मारहाण करून तसेच फिर्यादी यास अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली.

Ankush mobile

यावरून पोलीसानी वरील सर्व आरोपीवर कलम 324,294,506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि शाम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात एएसआय डोमाजी भादीकर करीत आहे.

One Day Ad

हे देखील वाचा :

माजी मुख्याध्यापक गजाननराव मोहितकर यांचे निधन

गोडीगुलाबीने केली महिलेची शिकार, लग्नाचे नाव काढताच दिला नकार

मारेगावच्या ठाणेदारांची सहका-यांसह वेषांतर करत जुगार अड्ड्यावर धाड

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!