माजी मुख्याध्यापक गजाननराव मोहितकर यांचे निधन

वणी येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार अंत्यसंस्कार

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील रहिवासी (इंदिरा चौक ) माजी मुख्याध्यापक गजाननराव मणीराम मोहितकर (79) यांचे वृद्धापकाळाने दि.18 सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11. 30 वाजता वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिक्षण प्रसारक समिती, वणी अंतर्गत संचालित आदर्श विद्यालयात 1963 ते 2002 पर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंड आणि बराचसा आप्त परिवार आहे. ते कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथील मूळ रहिवासी होते.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!