साई मंदीरासमोर आगीचा रुद्रावतार, हॉटेल न्यू रसोई जळून राख
थोडक्यात वाचल्या जवळच्या दोन बँक, पाहा घटनेचा भीषण व्हीडीओ
बहुगुणी डेस्क वणी: साई मंदिरासमोर नांदेपेरा रोडवरील एका कॉम्प्लेक्सला मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत हॉटेल न्यू रसोई जळून राख झाले. आग लागल्यानंतर इमारतीत जोरदार धमाका झाला. त्यात कॉम्प्लेक्सला लावलेली काचं फुटलीत. आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन अग्निशमन वाहनांनी आग आटोक्यात आणली.
यवतमाळ मार्गावर साईमंदिरासमोर एक व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. याच्या तळमजल्यावर एक बॅंक तर वरच्या माळ्यावर न्यू रसोई हे हॉटेल आहे. बुधवारी दिनांक 26 मार्च रोजी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाले. सर्व स्टाफ आपापल्या घरी गेला. मात्र 1 वाजताच्या सुमारास इमारतीतून धूर निघायला लागला. या मार्गावर मध्यरात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. त्यांना रेस्टॉरन्ट मधून धूर निघताना दिसला. त्यांनी ही माहिती अग्निशामक दिली.
अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान आग लागल्याची बातमी आगीसारखीच पसरली. बघ्यांची घटनास्थळी गर्दी गोळा झाली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला आग विझवण्यास सुमारे दोन तास लागले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. तरी लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
याच इमारतीत इक्विटास बँक आहे. जी यात थोडक्यात बचावली. तसेच दुस-या फ्लोअर पर्यंत आग पोहोचण्याच्या आधीत आटोक्यात आणण्यात आली. बाजूलाच अन्य दुकाने आणि स्टेट बँकदेखील आहे. जर ही आग अधिक पसरली असती, तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. आगीची माहिती मिळताच बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचलेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर त्यांच्या पथकासह जातीने उपस्थित होते.
फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनात फायर फायटर दीपक वाघमारे, आशुतोष जगताप, प्रीतेश गौतम, शुभम टेकाम व वाहनचालक देविदास जाधव यांनी आग आटोक्यात आणली.
पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ…
Comments are closed.