ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

रविवारी हॉस्पिटलचे लोकार्पण, शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

Jadhao Clinic

जब्बार चीनी, वणी: शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळ ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलचे रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे. या निमित्त हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

सदर कॅम्पमध्ये रुग्णांची तपासणी करून विविध रोगांचे निदान केले जाणार आहे. याशिवाय बीपी, शुगर आणि ईसीजी देखील केली जाणार आहे. सदर शिबिर केवळ 11 ते 5 पर्यंतच सुरू राहणार आहे. ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे ओपीडीचा वेळ हा रोज सकाळी 9 ते 1 व दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत राहणार आहे. तर दर रविवारी विदर्भातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट व कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. रोहीत चोरडिया, MBBS, MD (Medicine) हे भेट देऊन रुग्णांना आरोग्य सेवा देणार आहेत.

लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा वणी व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. एस जमील अहमद, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. एस नदीम अहमद यांनी केले आहे.

पत्ता: एस डी कॉम्प्लेक्स, बाकडे पेट्रोल पम्प समोर, यवतमाळ रोड वणी
जिल्हा यवतमाळ

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!