बहुगुणी डेस्क, वणीः राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. लोढा यांनी या शिबिराचे आयोजन वणी स्थानिक महावीर भवन येथे 22 जुलै रोजी दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत हे तपासणी व उपचार शिबिर होईल.
या शिबिरात स्त्रीरोग तपासणी डॉ. महेंद्र लोढा, डॉ. प्रीती लोढा, डॉ. मनीषा जुमनाके, डॉ. वीण चवरडोल, हृदयरोग व मधुमेह तपासणी डॉ. गणेश लिमजे, डॉ. जितेंद्र बोकडे, बालरोग तपासणी डॉ. सुनीलकुमार जुमनाके, डॉ. मनीष भगत, अस्थिरोग तपासणी डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. विकास हेडाऊ करतील. जनरल फिजिशियन डॉ. पाटील, डॉ. अनिरूद्ध वैद्य, सर्जरी विभागाचे डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुंधडा, डॉ. नीलू मुंदडा, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी पदलमवार हे तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी करतील.
किशोरवयीन मुलींकरिता ‘‘कळी उमलताना’’ मार्गदर्शन शिबिर दुपारी 4 ते 6 या वेळेत याच ठिकाणी होईल. वयानुरूप शरीरात होणाऱ्या शारीरिकि व मानसिक बदलानंतर घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त असे मार्गदर्शन डॉ. डॉ. गिरीष माने व डॉ. वृषाली माने करतील. मुली व मातांना या मागर्दर्शनाचा लाभ घेता येईल. जुनी वैद्यकीय कागदपत्रे, मेडिकल रिपोर्ट असल्यास शिबिराला सोबत आणावी. अधिक माहितीकरिता डॉ. लोढा हॉस्पिटलजवळील राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यालयात संपर्क साधावा. अशी विनंती पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. लोढा यांनी केली आहे.