महिलांसाठी खूशखबर: एक दिवशीय मोफत मेहंदी वर्कशॉप
रविवारी ढुनेनगरमध्ये रंगणार प्रोफेशनल मेहंदी कार्यशाळा
बहुगुणी डेस्क, वणी: महिलांसाठी वणीतील ढुमेनगर येथे रविवारी एक दिवशीय प्रोफेशनल मेहंदी (मेंदी) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मोफत आहे. मात्र रजिस्ट्रेशन करणा-या पहिल्या 20 सदस्यांनाच प्रवेश मिळणार आहे. या कार्यशाळेत पारंपरिक मेहंदी, अरेबिक मेहंदी, ब्रायडल मेहंदी, डीझायनर मेहंदी, फिगर मेहंदी इत्यादीसह मेहंदी काढण्याच्या विविध स्ट्रीक्स शिकवल्या जाणार आहेत. तसेच मेहंदी काढण्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन मोफत असून पहिल्या 20 रजिस्ट्रेशन करणा-या महिला, विद्यार्थीनींना प्रवेश दिला जाणार आहे. वर्कशॉप दु. 1 ते 4 या वेळेत होणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी 9022275342 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री प्रोफेशनल मेहंदी क्लासेसच्या संचालिका जयश्री मॅडम यांनी केले आहे.
काय शिकवले जाणार वर्कशॉपमध्ये?
मेहंदीचे विविध प्रकार व स्टाईल (बॉम्बे, हैदराबाद, अरेबिक, दुबई फ्लॉवर्स इ.), मेहंदी ड्राईंगचे बेसिक, मेहंदी लाईनच्या विविध टेकनिक, मेहंदी आर्ट डेप्थ, मेहंदी कोन कसे तयार करायचे, मेहंदी कशी भिजवायची, मेंहंदी रंगण्याच्या विविध ट्रिक्स, मेहंदीचे विविध पॅटर्न, प्रॅक्टीसच्या विविध ट्रीक्स आणि टीप्स, मेहंदी काढताना काय काळजी घ्यायची? मेहंदीत एक्स्ट्रा कलर कसे वापरायचे, मेहंदीला फिनिशिंग टच कसा द्यायचा, मेहंदीचे फिलर एलिमेंट, चेक व ग्रिड तयार करण्याच्या विविध ट्रीक्स, मेहंदी काढण्याचे स्किल डेव्हलपमेंट इत्यादी गोष्टींबाबत प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन केले जाणार आहे.
कोण होऊ शकते सहभागी?
हे वर्कशॉप केवळ महिलांसाठी असून यासाठी वयाचे बंधन नाही, शाळेतील मुलींसह वृद्ध महिलांही या वर्कशॉपमध्ये भाग घेऊ शकतात. वर्कशॉपसाठी कोणत्याही प्रकारचा छुपा खर्च नाही, वर्कशॉपसाठी कोन आयोजकांतर्फे पुरवण्यात येईल. या वर्कशॉपचा वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील महिला व विद्यार्थीनींनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – श्री मेहंदी आर्ट क्लासेस
जिलठे यांच्या घरी, पहिला माळा, हनुमान मंदिराजवळ,
लोटी महाविद्यालय रोड, ढुमेनगर, वणी
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क – 9022275342
Comments are closed.