गणेशोत्सवाचा खर्च टाळून गतिमंद मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत
शिव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर यांचा पुढाकार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राम्हणी फाटा येथील शिव गणेशोत्सव मंडळाने यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून मागील जमा शिल्लक खर्च न करता, एका गतिमंद मुलाच्या शस्त्रकियेकरिता 34 हजाराची आर्थिक मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर यांच्या पुढाकाराने साकारला हा सुप्त उपक्रम.
सर्वत्र श्री गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा झाला. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात, भव्यदिव्य डेकोरेशन, ढोलताशाचा गजर व अवाढव्य खर्च करून साजरा केला जातो. मात्र या वर्षी कोरोना महामारी असल्याने प्रशासनाच्या घालून दिलेल्या विविध नियमाच्या अधीन राहून, गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
मागील वर्षीपासून शिव गणेशोत्सव मंडळाची स्थापना ब्राम्हणी फाटा येथे होते. यामंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर आहे. पहिल्याच वर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. त्यात जमा झालेल्या लोकवर्गणीतून सर्व खर्च वजा करता, मंडळाजवळ 34 हजार रुपये शिल्लक पाडण्याची किमया अध्यक्ष रवी बोढेकर यांनी करून दाखविली.
यावर्षाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार नाही हे लक्षात घेता, त्यांनी आपल्या मंडळातील सदस्यांना काही सूचना केल्यात. त्यात यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे व शहरातील एक स्ट्रान्सपोर्टवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे सोमेश्वर ढवस यांच्या मुलगा गतिमंद आहे. त्यात त्याला आता किडनीचा आजार झाला.
त्याच्यावरील शस्त्रक्रियेकरिता डॉक्टरानी 1लाख खर्च येतो. हे ऐकताच सोमेश्वर यांच्यावर दुःखाचे आभाळ कोसळले. त्यांनी ही बाब रवी बोढेकर यांना सांगितली. त्यांवर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता मागील वर्षीच्या जमा लोकवर्गणीतून शिल्लक असलेले 34 हजार रुपये देऊन मदत करूया ही कल्पना सर्वांना पटली व सर्वांच्या होकारांनी हा सुप्त उपक्रम घडला.
जनसेवा हीच ईश्वरी सेवा
गणेशोत्सव दरवर्षी मोठया थाटामाटात साजरा केला जातो. भव्यदिव्य डेकोरेशन, महागडे ढोलताशांच्या व इतर वायफळ खर्च केला जातो.मात्र यावर्षी खऱ्या खुऱ्या पद्धतीने गरजू ना मदत करून श्री गणेशाचा आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून ‘ जनसेवा हीच ईश्वरी सेवा ‘ हे आज खऱ्या अर्थाने साध्य होते आहे.
– रवी बोढेकर