प्रगतीनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रसंगावधनामुळे दरोडेखोर पसार

शहरात सातत्याने दरोड्याच्या घटना, वणीकर दहशतीत

विवेक तोटेवार, वणी: प्रगती नगर येथील डोर्लीकर यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. डोर्लीकर यांच्या मुलीच्या प्रसंगावधनामुळे दरोडेखोरांचा प्लान फसला. मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. बुधवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यात दरोड्याच्या अनेक घटना झाल्यात. यामुळे सर्वसामान्य दहशतीत आले आहे.

प्राप्त माहिती नुसार, सुभाष डोर्लीकर हे वणीतील प्रगती नगर येथील रहिवासी आहेत. ते त्यांच्या पत्नीसह प्रगती नगर येथे राहतात. त्यांच्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ती पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करत असल्याने सध्या घरी आली आहे. बुधवारी 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास कार घेऊन 5-6 दरोडेखोर प्रगती नगरमध्ये आले. त्यांनी डोर्लीकर यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून आत घरात प्रवेश केला.

वरच्या बेडरूममध्ये सुभाष यांची मुलगी होती. तर तळमजल्यातील बेडरूममध्ये डोर्लीकर दाम्पत्य झोपले होते. दरोडेखोरांनी एका रुममध्ये शोधाशोध केली. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे दरोडेखोरांनी वरच्या बेडरूमकडे धाव घेतली. दरम्यान सुभाष यांना घरी कुणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी तातडीने शेजारी फोन केला. याच वेळी दरोडेखोर वरच्या बेडरुमचा दरवाजा उघडण्यासाठी गेले. मात्र दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना मुलीला जाग आली. तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. आरडा ओरड झाल्याने शेजारी जागे झाले. तर दरोडेखोरांनीही घरून पळ काढला. काही शेजा-यांना दरोडेखोर कारने पळून जाताना दिसले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सकाळी डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले. ओळख स्पष्ट होऊ नये म्हणून दरोडेखोर हेल्मेट घालून असल्याची माहिती आहे. दरम्यान हे दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही बोलले जात आहे. डोर्लीकर पती-पत्नी हे दोघेच घरी असतात याची दरोडेखोरांना माहिती होती. याबाबत अनेक दिवसांपासून दरोडेखोर रेकी करीत होते. त्यानंतर त्यांनी दरोडा टाकण्याचा प्लान केला, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. (सदर बातमी प्रामथिक माहितीच्या आधारावर घेतलेली आहे. अधिकची व अधिकृत माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.)

परिसरात दरोड्याच्या सातत्याने घटना
4 महिन्यात वणी परिसरात दरोड्याच्या अनेक घटना घडल्यात. एप्रिल महिन्यात पटवारी कॉलोनीत वृद्ध दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून लाखोंचा दरोडा टाकण्यात आला. या घटनेचे आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. त्याच महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पळसोनी फाट्याजवळ चौकीदाराची हत्या करून दरोडा टाकण्यात आला. तर अलिकडेच एका मोबाईल शॉपी मालकाला दरोडेखोरांनी लुटले होते. आधीच चोरीच्या घटनेमुळे त्रस्त झालेले वणीकर आता दरोड्याच्या घटनेमुळे दहशतीत आले आहे.

कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड

Comments are closed.