खळबळजनक… 50 वर्षीय महिलेवर गँगरेप… 4 नराधमांचे कृत्य

जितेंद्र कोठारी, वणी: एक महिला मजुराला बळजबरी कारमध्ये नेऊन तिच्यावर चार नराधमांनी गँगरेप केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास नवरगाव शेतशिवारात ही घटना घडली. आरोपी केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी या महिलेसोबत अनैसर्गीक कृत्य केल्याचाही आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चारही आरोपी हे वणीतील असून पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींवर भादंविच्या विविध कलमांसह ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, राजूर कॉलरी येथील एका कारखान्यात 50 वर्षीय महिला मजुरीचे करते व एका झोपडीत ती तिच्या मुलासह राहते. पीडित महिलेच्या मुलाचे आरोपी असलेल्या एका सोबत आर्थिक व्यवहार असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी दिनांक 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास चारही आरोपी दोन मोटार सायकलने पैसे मागण्यासाठी राजूर येथे पीडितेच्या घरी गेले. मात्र त्यावेळी पीडित महिलेचा मुलगा घरी नव्हता. आरोपींनी मुलाबाबत पीडित महिलेला विचारणा केली असता मुलगा घरी नसल्याने तिने आरोपींना सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तुझ्या मुलाबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे अशी बतावणी करून आरोपींनी महिलेला एका ऑटोत बसवून वणीला आणले. वणीत आरोपींनी एक अर्टिगा कार भाड्याने केली. त्या कारमध्ये पीडिता व चारही आरोपी बसले. त्यांनी सुरुवातीला कार मुकुटबन मार्गावरील एका बारसमोर कार थांबवली. चार ही आरोपी बारमध्ये जाऊन दारू पिले. येताना त्यांनी एका पाण्याच्या बॉटलमध्ये दारू मिक्स करून आणली. आरोपींनी कारमध्ये पीडितेला बळजबरी दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिथून आरोपींनी मुलाचा पत्ता दे असे सांगत कार यवतमाळ रोडला वळवली. त्यानंतर ते खडकी (बुरांडा) व नंतर करणवाडी मार्गे नवरगाव गेले. तिथे त्यांनी पीडित महिलेला एका शेतात नेले व तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाही तर त्यांनी महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले.

घटनेनंतर रात्री उशिरा पीडितेला राजूर कॉलरीतील रेल्वे रुळाशेजारी सोडून दिले. दुस-या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी दिनांक 29 जून रोजी पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेची तक्रार दाखल करून घेतली व दुपार पर्यंत चार ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (39) रा. टागोर चौक वणी, कपिल व्यंकटेश अंबलवार (35) रा. जैताई नगर वणी, मनोज अजाबराव गाडगे (47) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (22) रा. आटीआय जवळ लालगुडा यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींवर भादंविच्या कलम 354, 354 (अ), (1), 366, 376 (ड), 504, 506 व ऍट्रोसिटीच्या 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3 (2)(v), 3(2) (va) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची यवतमाळ येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजीत जाधव, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे, पोलीस शिपाई विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, शुभम सोनुले, रवि इसनकर यांनी केली. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीत आहे.

Comments are closed.