पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपरिषद शाळेतील लोकप्रिय शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते स्व. दिलीप कोरपेनवार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ विजय चोरडिया मित्रपरिवार आणि स्माईल फाऊंडेशन, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 14 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूर येथील छोरिया ले-आऊटमधील श्री विनायक मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात येईल. आतापर्यंत 1,300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, नोंदणीसाठी आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत.
या स्पर्धेत इयत्ता 4 थी आणि 5 वी साठी अ-गट, इयत्ता 6 वी ते 8 वी साठी ब-गट आणि इयत्ता 9 वी ते 12 वी साठी क-गट असेल. नोंदणीसाठी अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2025 आहे. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ₹10, तर CBSE विद्यार्थ्यांसाठी ₹20 आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक ₹5,000, द्वितीय ₹4,000, तृतीय ₹3,000 आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 10 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल, ज्यामध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) नसतील. प्रश्न सामान्य ज्ञान, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांवर आधारित असतील. गणित आणि विज्ञानाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.
अ-गटाची परीक्षा सकाळी 10:00 ते 11:00, तर ब-गट आणि क-गटाची परीक्षा दुपारी 12:00 ते 1:30 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी उपस्थित राहावे. शाळेचे ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे, परंतु गणवेश परिधान करणे ऐच्छिक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा एग्जाम बोर्ड आणि काळ्या रंगाची बॉलपेन आणावी. परीक्षेदरम्यान मोबाइल, कॉपी किंवा इतर उपकरणांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे; तसे आढळल्यास विद्यार्थी बाद ठरेल.
मागील वर्षी या स्पर्धेत 1,600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी व्हावेत, अशी आयोजकांची विनंती केली आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप क्रमांक 7038204209 वर संपर्क साधावा, असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी केले आहे. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी पियूष आत्राम, आदर्श दाढे, डॉ. विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनात स्माईल फाउंडेशनचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहे.




Comments are closed.