बाहेर करायला गेलेत उपचार, अन् घरात चोराचा संचार

घरफोडीचे सत्र सुरूच, आता चिखलगावात चोरी

 

विवेक तोटेवार, वणी: मंगलकार्य किंवा आजारपणासाठी अनेकदा आपण घराला कुलुपबंद करून बाहेरगावी जातो. मात्र योग्य दक्षता न घेतल्यास चोर आपला हात घरावर साफ करतात. याचीच प्रचिती चिखलगावातील साफल्यनगरातील भारत वसंतराव ठाकरे (47) यांना आला. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्याने 50 हजार रूपये रोख आणि दागिने असा 106,500 /- रूपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. ही घटना 23 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघड झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सविस्तर वृत्त असे की, चिखलगावातील मांगळकर ले-आऊटमधील साफल्यनगर येथे भारत वसंतराव ठाकरे राहतात. उपचारांकरिता ते दिनांक15 फेब्रुवारीला दुपारी 3 च्या सुमारास चंद्रपूरला गेलेत. त्यानंतर त्यांचं काम झाल्यावर ते 23 फेब्रुवारीला सकाळी १०च्या सुमारास घरी परतलेत. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घराच्या दाराचे कडी कोयंडे तोडलेले दिसलेत. घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. जाताना त्यांच्या आलमारीमध्ये त्यांच्या कामाचे 50,000 रूपये रोख ठेवलेले होते.

सोबतच त्यांच्या पत्नी व लेकराचे सोन्याचे 6 ग्रॅमचे अंदाजे 24,000 किंमतचे कानातले, 3 ग्रॅमची अंदाजे 12,000 रूपये किंमतीची अंगठी, अंदाजे 20,000 रूपये किमतीचा 5 ग्रॅम सोन्याचा गोफ, अंदाजे 500 रूपये किमतीचे 7 ग्रॅम चांदिचे चाळ असा एकुण- 106,500 /- रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. कदाचित चोराने इतके दिवस त्यांच्या घरावर पाळत ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

ठाकरे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात कलम 331(3), 331(4), 305(a) BNS अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास API नीलेश अपसुंदे करत आहेत.

Comments are closed.