बहुगुणी डेस्क, वणी: घरात घुसून चोरट्याने सव्वा लाखांपेक्षा अधिकची रक्कम लंपास केली. झरी तालुक्यातील गाडेघाट येथे बुधवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरमालक दीपक नीळकंठ मालेकार यांनी याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीपक हे गाडेघाट येथील रहिवासी आहेत. ते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. सकाळीच्या शेताच्या कामानंतर ते दु. 11.30 वाजताच्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांना घरात असलेले कपाट उघडे दिसले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आलमारीतील लॉकरमध्ये ठेवून असलेले एक लाख तीस हजार रुपये चेक केले असता त्यांनी सदर रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांची आई घरीच होती. मात्र तिला दिसत नाही. त्यामुळे चोरट्यांनी हात साफ घेतला. दीपक मालेकार यांनी याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
पुष्पा 2 सिनेमाचे एक्सटेंडेड वर्जन रिलिज… पाहा 20 मिनिटांचा अधिकचा सिनेमा
Comments are closed.