वेकोलि कर्मचारी किरण मून यांचे अल्पशा आजाराने निधन

मंगळवारी दु. 12 वा. दामले ले आऊट येथील घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी किरण विठ्ठलराव मून (59) यांचे आज सोमवारी दिनांक 27 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र रविवारी रात्री त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सकाळी सव्वा 11 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. किरण मून हे वेकोलिच्या पिंपळगाव (जुनाड) येथे कार्यालय अधिक्षक म्हणून कार्यरत होते. ते वेकोलित मूनबाबू नावाने परिचित होते. कायम आनंदी राहणारे व मनमिळावू स्वभावाची व्यक्ती अशी त्यांची वेकोलित ओळख होती. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव नागपूरहून वणी येथे आणण्यात येणार आहे. मंगळवारी दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दामले ले आऊट येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, सून, वडील, बहिणी, जावई, नातंवड असा आप्तपरिवार आहे. किरण मून यांना वणी बहुगुणी कडून भावपूर्ण आदरांजली.

Comments are closed.