मोठी कारवाई: कत्तलीसाठी जाणा-या 14 गोवंशांची सुटका

● खरबडा मोहल्ला बनला गोवंश तस्करीचा प्रमुख अड्डा

जितेंद्र कोठारी, वणी: वाहनात निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असताना 14 गौवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली. येथील खरबडा मोहल्ला भागात मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत 14 गौवंश किंमत 61 हजार आणि एक बोलेरो पिकअप वाहन किंमत 3 लाख 50 हजार असे एकूण 4 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

येथील खरबडा मोहल्ल्यातून एका पिकअप वाहनामध्ये कत्तलीसाठी गौवंश भरुन घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलीस पथकाने खरबडा मोहल्ला भागात रेड केली. तेव्हा त्याठिकाणी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (MH34AB2478) या वाहनामध्ये जनावरांना निर्दयपणे कोंबून चारापाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी नेत असल्याचे मिळून आले.

पोलिसांनी पिकअपमध्ये भरलेले 14 जनावरांची सुटका केली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन वाहनामधील चालक व इतर व्यक्ती फरार होण्यास यशस्वी झाले. वणी पोलिसांनी सुटका करण्यात आलेले सर्व जनावरांना माऊली गौरक्षण संस्था रासा येथे दाखल केले. तर बोलेरो पिकअप वाहन जप्त करून ठाण्यात आणले.

सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी विरुद्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 कलम 5 (अ) (ब), कलम 9, 9(अ) प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 (1), (क), (घ), (ड), (च), (झ) सह मोवाका कलम 103 (3), 177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, पीएसआय शिवाजी टिपूर्णे, प्रवीण हिरे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, गजानन भांदककर, हरींदर भारती, विशाल गेडाम, विजय राठोड, शुभम सोनुले शंकर चौधरी यांनी पार पाडली. पुढील तपास हे.कॉ. सुदर्शन वानोळे करीत आहे. 

खरबडा मोहल्ला झाले गौवंश तस्करीचे प्रमुख केंद्र
येथील खरबडा मोहल्ला क्षेत्र मागील काही काळापासून गौवंश तस्करीचा प्रमुख केंद्र म्हणून कुख्यात झाला आहे. वणी पोलिसांनी या भागात अनेकदा कार्यवाही करून गौवंशची सुटका केली आहे. गौवंश तस्करांवर कठोर कार्यवाही होत नसल्यामुळे जामिनावर सुटका होताच जनावर तस्कर पुन्हा गौवंश तस्करी व गौहत्याचे कुकृत्य सुरु करतात. खरबडा भागातून मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यात गौवंश व गौमांस तस्करी होत असल्याची माहिती आहे. गौवंश तस्करी व गौहत्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना गौवंश तस्करांवर कठोर कार्यवाही का केली जात नाही. असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

हे देखील वाचा:

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Comments are closed.