मुकुटबन येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय द्या

मंगेश पाचभाई यांची मागणी, तहसिलदारांना निवेदन

प्रतिनिधी, झरी: पोलीस स्टेशन, विविध कार्यालय, महाविद्यालये, बाजारपेठ इत्यादी मुकुटबन येथे आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण झरी येथे असल्याने नागरिकांना कार्यालयीन कामासाठी झरी येथे जावे लागते. परिणामी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुकुटबन येथे नायब तहसिलदारांचे कार्यालय द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसिलदार झरी यांना निवेदन दिले आहे.

मुकुटबन हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव तसेच बाजारपेठ आहे. पंधरा हजाराच्या वर लोकसंख्या मुकुटबन येथे आहे. शाळा महाविद्यालय,विद्युत कार्यलय,वनविभागाने कार्यालय सुद्धा इथेच आहे, तसेच पोलीस स्टेशन,व इतर मोठे गावे सुद्धा मुकुटबन लगत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामासाठी झरी येथे जावे लागते.

नायब तहसीलदार कार्यालय मुकुटबन येथे झाल्यास जनतेला होणारा त्रास व आर्थिक भुर्दंड वाचेल. एका साध्या स्टॅम्प साठी जनतेला झरी गाठावी लागते, उत्त्पन्न दाखले व इतर साठी नागरिक वारंवार चकरा माराव्या लागत आहे. नायब तहसीलदार कार्यालय मुकुटबन येथे झाल्यास जनतेला त्याचा फायदा होईल असे निवेदनातून म्हटले आहे. हेच निवेदन देते वेळी गणेश पेटकर, राहुल ठाकूर, प्रणाल गोंडे आदी उपस्थित होते

Comments are closed.