ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर… अवघ्या एका मतांनी ‘या’ ग्रामपंचायतीतील सरपंचपदाचे उमेदवार विजयी

भाजपचा अर्ध्यापेक्षा अधिक जागांवर सरपंच, चिखलगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, शिंदे गटानेही उघडले खाते.

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत सरपंचपदासाठी 56 उमेदवार रिंगणात होते. तर 137 सदस्यपदासाठी 344 उमेदवार उभे होते. यात सर्वात महत्त्वाची व मोठी समजल्या जाणा-या चिखलगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात कातकडे गटाने बाजी मारली आहे. त्यांच्या गटाचे रुपाली सुनिल कातकडे यांनी सरपंचपदासाठी विजय मिळवला आहे. वारगाव येथील निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. अवघ्या 1 मताने या निवडणुकीतील उमेदवार निवडून आले आहे. वणी तालुक्यात भाजपचा बोलबाला दिसून आला. अर्ध्या पेक्षा अधिक ठिकाणी भाजप समर्थीत सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर केसुर्ली येथून विजय मिळवत शिंदे गटाने खाते उघडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. तर अपक्षांनीही निवडणुकीत बाजी मारली आहे. अहेरी येथील निवडणूक अविरोध झाली होती. तर शिंदोला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने इथे निवडणूक झाली नाही. झरी तालुक्यातील 4 पैकी 3 जागांवर भाजपने बाजी मारली आहे. तर एक जागी काँग्रेसचा सरपंच विजयी झाला आहे. मारेगाव तालुक्यात 9 पैकी 5 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.

असे आहेत विजयी उमेदवार
मंदर ग्रामपंचायतीमधून वर्षा अनंता बोढे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 768 मते मिळाली. त्यांनी किरण मोहितकर यांचा परभव केला. मोहितकर यांना 424 मते मिळाली. प्रकाश बोबडे हे रांगणा येथून विजयी झाले. त्यांना 456 मते मिळाली. त्यांनी राकेश लोठे यांचा पराभव केला. लोढे यांना 228 मते मिळाली. आशा प्रवीण झाडे यांनी बोर्डा येथून विजय मिळवला त्यांना 965 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी शीतल भोयर यांना अवघे 325 मते मिळाली. कुरई येथून स्वाती विजय झाडे या विजयी झाल्यात. 

चारगाव ग्रामपंचायतीमधून शंकर नारायण वालकोंडे हे 336 मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी हिरालाल पाटील यांना 143 मते मिळाली. सुवर्णा भोयर या 308 मते घेऊन वरझडी मधून निवडून आल्यात. त्यांच्या प्रतिस्पर्धी पौर्णिमा बोढाले यांना 242 मते मिळाली. कायर ग्रामपंचायतीमध्ये नागेश धनकसार निवडून आलेत. त्यांना 614 मते मिळाली. त्यांनी राकेश शंकावार यांचा पराभव केला. शंकावार यांना 526 मते मिळाली. वेळाबाई ग्रामपंचायतीतून रंजना बांदूरकर या निवडून आल्यात.

वारगाव ग्रामपंचायतीमध्ये रंगतदार लढत
वारगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चुसशीची ठरली. या निवडणुकीत रुखमाबाई प्रमोद पिंपळकर या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. रुखमाबाई यांना 143 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वंदना चिकनकर यांना 142 मते मिळाली. वणी तालुक्यातील आणखी एक महत्त्वाची ग्रामपंचायत गणेशपूर येथून आशा मनोज जुनगरी यांनी 980 मते घेत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी प्रियंका अरविंद ठाकरे यांचा पराभव केला. त्यांना 368 मते मिळाली. ब्राह्मणी येथून स्मिता नामदेव राजगडे या 263 मते घेऊन विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी मीना संजय मंगाम यांना 197 मते मिळाली. 

कळमना (बु) येऊन वंदना सचिन अगीरकर या 218 मते घेऊन विजयी झाल्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी संगीत राजेंद्र बोबडे यांना 156 मते मिळाली. रजनी अशोक पिदूरकर या 772 मते घेऊन साखरा (दरा) ग्रामपंचायतीतून निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शुभांगी ठाकरे यांना 640 मते मिळाली. केसुर्ली येथून मंगेश सुरेश काकडे हे 189 मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी मंसराम गोहणे यांचा अल्प मतांनी पराभव केला. त्यांना 167 मते मिळाली. मेंढोली येथून सविता विनायक ढवस या 395 मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी माया विनोद महाकुलकर यांचा पराभव केला. त्यांना 307 मते मिळाली. पुरड (नेरड) ग्रामपंचायतीमधून गणेश बापूराव टेकाम हे 358 मते घेऊन निवडून आलेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद कुळमेथे यांना 208 मते मिळाली. तर चिखलगाव येथून रुपाली सुनिल कातकडे या निवडून आल्या आहेत.

निकाल ऐकण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

रांगणा, मंदर व ब्राह्मणी येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन

Comments are closed.