रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ

नांदेपेरा मार्गावर सुरु रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये अद्यावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारे फिजिओथेरपी व कायरोप्रॅक्टिक उपचार उपलब्ध... औषधरहित व विना ऑपरेशन फिजिओथेरपी उपचार आजच्या काळात गरजेचे

0
111

वणी बहुगुणी डेस्क : शहरातील नांदेपेरा मार्गावर रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ नुकतेच गुढी पाडवाच्या दिवशी करण्यात आले. पूर्वी लोढा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये असलेले रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे नांदेपेरा मार्गावरील नगराळे हॉस्पिटल समोर स्थलांतरण करण्यात आले असून अत्याधुनिक उपकरण व अद्यावत सुविधा रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

आजचं जीवन हे धकाधकीचं आणि धावपळीचं झाल्यामुळे गुडघेदुखी, खांदेदुखी आणि टाचदुखी इत्यादीच्या त्रासाला अनेकांना सामोर जावं लागतं. या धावपळीमध्ये (तरुणपणी) आपण या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतो. जसजसं वय वाढत जातं, तसतसे हे दुर्लक्षिलेले आजार डोकं वर काढायला लागतात. अनेक पद्धतीनं उपचार करूनही त्यातून सुटका होत नाही. अशा दुखण्यांवर फिजिओथेरपीद्वारे योग्य उपचार करून घेतल्यास सर्वायकल स्पोंडीलीसीस, सायटीका, मणक्याचे आजार इत्यादींपासून सुटका होऊ शकते.

सद्यस्थितीत अंगमेहनतीचे काम नसून बैठकीची कामे अधिक प्रमाणात करावी लागत असल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यात कोरोनापासून अनेकांची कामाची पद्धतच बदलल्याने ही समस्या अधिकच वाढली आहे. त्यामुळे अनेकांना फिजिओथेरपी करण्याची वेळ आली आहे. स्पॉंडिलीसिस, पॅरालिसिस, सांधेदुखी तसेच कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी करावीच लागते. अलीकडे अनेकांना मणक्याचे आजार जडले आहे. त्यावर विना ऑपरेशन फिजिओथेरपी हा उत्तम उपाय मानला जातो. त्यामुळे बरेच नागरिक फिजिओथेरपीकडे वळल्याचे दिसून येत आहे.

कंबरदुखी, मान दुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघे दुखी, मणक्याचे विकार स्नायूंचे दुखणे, सांधेदुखी (Frozen shoulder), कोपरदुखी (Tenis Elbow), खेळा संबधीचे दुखापत, गुडघ्याची वाटी बदलल्यानंतर पुन्हा पूर्वरत न वाकणे, मज्जातंतू व मेंदूशी संबंधित असणारे आजार, अर्धांगवायू/लकवा (Paralysis), चेहऱ्याचा लकवा (Bells Palsy), हातपाय थरथरणे (Parkinson’s disease), पाय लचकणे (Ligament Problems), हातापायांना मुंग्या येणे, चालताना तोल जाणे (Unbalancing) या आजार फिजिओथेरपीने बऱ्या होतात.

रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी परिजन व इष्ट मित्रांसह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सहा. पोलिस निरीक्षक संजय आत्राम, शिरपूरचे ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक गजानन करेवाड, डॉ. महेंद्र लोढा, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. गणेश लिमजे, डॉ. विजय खापने, डॉ. प्रतीक कावडे, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. भालचंद्र आवारी, डॉ. अरुंधती मोडक, डॉ. प्रणाली पावडे, डॉ. बलकी, डॉ. शेडामे,  मेघश्याम तांबेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा आदी गणमान्य नागरिकांनी भेट देऊन डॉ. रौनक कोठारी यांना शुभेच्छा दिल्या. 

फिजिओथेरपीत व्यायामाचे प्रकार हे विशिष्ट पद्धतीने करायचे असतात. ते विशिष्ट अवयवांच्या दुखण्यांसाठीच ठरवलेले असतात. काही विशिष्ट कालमर्यादेत केलेल्या या व्यायाम प्रकारांनी आजार मुळापासून बरा होण्यास मदत होते. 

डॉ. रौनक कोठारी (फिजिओेथेरपीस्ट)        संचालक : रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक, वणी 

आजच संपर्क करा : 83788 09915

Relief Physiotherapy clinic
Previous articleप्रेयसीचे वारंवार शोषण, फसवणूक करणारा प्रियकर गजाआड
Next articleमनसे नेते राजू उंबरकर यांचे वणीत जंगी स्वागत
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...