गुढीपूजन, घुगरी वाटप, शिवकालीन शस्त्रविद्या प्रदर्शनाने साजरा होईल गुढीपाडवा…

गत11 वर्षांची अखंड परंपरा, यंदा होईल तपपूर्ती म्हणजेच 12 वे वर्ष

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहर मुळातच उत्सवप्रिय. इथे अनेक सण आणि उत्सव सार्वजनिक पातळीवर होतात. त्यात वणीकरही उत्साहाने सहभागी होतात. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यासाठी या वर्षीही गुढीपाडवा उत्सव समिती आणि स्वराज युवा संघटना जय्यत तयारीनिशी सज्ज झाली आहे. या दोहोंच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता गुढीपूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवतीर्थावर आमदार संजय देरकर गुढीचे पूजन करतील.

ते गुढी उभाीरून नवीन वर्षाचे स्वागत करतील. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑ सोसायटीचे अध्यक्ष संजय खाडे, अॅड. नीलेश चौधरी, गुढीपाडवा उत्सव समितीचे रवींद्र धुळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. गेल्या 11  वर्षांची आयोजनाची ही अखंड परंपरा गुढीपाडवा उत्सव समिती जोपासत आहे. यंदा या सार्वजनिक उत्सवाची तपपूर्ती म्हणजेच 12  वर्षे होतील. यावेळी शिवतीर्थावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सकाळी नऊ वाजता गुढीपूजनाच्या वेळी छत्रपती ढोल ताशा पथक मानवंदना देईल. नंतर शिवकालीन शस्त्रविद्या प्रदर्शन शिवानंद लाठीकाठी ग्रुप सादर करणार आहे. प्रतिष्ठित नागरिक सुनील कातकडे यांच्या वतीने घुगरीचे वाटप होणार आहे. या आयोजनात शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संस्थाचा विशेष सहभाग आहे. 

गुढीपाडवा उत्सव समिती, धनोजे कुणबी समाज संस्था, वणी, अखिल भारतीय माळी महासंघ, वणी ,धोबी समाज सामाजिक संस्था, वणी, आर्य वैश्य समाज संस्था, वण, बेलदार समाज संस्था, वणी, तेली समाज महासंघ, वणी, तिरळे कुणबी समाज संस्था, वणी, एरंडेल तेली समाज संस्था, वणी,महाराष्ट्र राज्य नाभिक महा मंडळ, वणी, जैन कलार समाज संस्था, वणी,

ब्राम्हण सभा, वणी, त्रिवेदी मेवाड ब्राम्हण समाज, वणी, शिंपी समाज संस्था, वणी, भारतीय सुवर्णकार समाज संस्था, वणी, शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी, गुरुदेव सेवा मंडळ, विठ्ठलवाडी, वणी, पद्मशाली समाज, वणी, संत रविदास चर्मकार समाज, वणी, पेरकी समाज संस्था, वणी, धनोजे कुणबी युवा मंच, वणी, जैन श्रावक संघ, वणी, मातंग समाज संस्था, वणी, प्रभूविश्वकर्मा झाडे सुतार समाज, वणी, मेहतर समाज संस्था, वणी, भावसार समाज संस्था, वणी, पाराशर ब्राम्हण समाज संस्था, वणी, पुज्य सिंधी पंचायत, वणी, धनगर समाज संस्था, वणी, लोहार

समाज संस्था, वणी, गोजकी समाज संस्था, वणी, सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, पहाड वनमाळी समाज, वणी, भोई समाज, वणी, बारी समाज, वणी, सरोदी समाज, वणी, भाट समाज, वणी, गुरव समाज, वणी, नाथजोगी समाज, वणी, पंचाळ समाज, वणी, गांडली समाज, वणी, बंजारा समाज, वणी, गोवारी समाज, वणी, क्षत्रिय छिपा समाज, वणी, कोष्टी समाज, वणी, ओतारी समाज, वणी, अग्रवाल समाज, वणी,

जयस्वाल समाज, वणी, आदींचे यात सहकार्य आहे. विकेश पानघाटे, अमर चौधरी, रवी धुळे, नितीन ठावरी, रविंद्र गौरकार, सुरेंद्र नालमवार, पुनीत रुईकर, आशीष आगबत्तलवार, मोहित रुईकर, नीलेश कोसारकर, नितीन दोडके, प्रमोद लोणारे, अंकुश बोढे, राहुल चौधरी, प्रफुल कोल्हे, विकास देवतळे, राहुल खारकर, राहुल झट्टे, आदित्य शेंडे,

किसन कोरडे, सारंग बिहारी, अमोल मोहितकर, अमित उपाध्ये, भरत बोबडे, राकेश पराये, स्वप्निल पिंपळशेंडे, कुणाल बोबडे, अनिरुद्ध देशपांडे, नितीन पडोळे, किशोर मंथनवार, संजय कावडे, बालाजी भेदोडकर, रोशन चिंचोलकर, मनोज विजवे, संजय चिंचोलकर आयोजन समितीत आहेत.

Comments are closed.