बर्थडे पार्टीत पिस्तुलने गोळीबार, हिरोपंती करणा-याच्या आवळल्या मुसक्या  

विवेक तोटेवार, वणी: वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळ्या झाडून हिरोपंती करणे एकाला चांगलेच महागात पडले.सो मवारी राजूर-भांदेवाडा शिवारातील एक शेतात रात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून विदेशी बनावटीची पिस्तुल जप्त केली आहे.  

तक्रारीनुसार तालुक्यातील राजूर भांदेवाडा रस्त्यावर स्मशानभूमीजव़ल मनोज कश्यप यांच्या शेतात वाढदिवसाची पार्टी सुरू होती. या पार्टीत दारू पिऊन डीजे वाजत असल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना रात्री उशिरा  मिळाली. ठाणेदारांनी सपोनि दत्ता पेंडकर यांच्या सोबत पोलीस स्टाफ यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांना बघताच अनेकांनी तेथून पळ काढला तर आरोपी उमेश किशोरचंद रॉय (34) रा. महादेवनगरी चिखलगाव याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. 

त्याच्याकडून एक विदेशी पिस्तुल जप्त करण्यात आली. त्याने या ठिकाणी दोन गोळ्या झाडल्याचीही कबुली दिली यावरून पोलिसांनी दोन खाली काडतुसाचे कव्हर जप्त केले आहे. आरोपिकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रिव्हॉल्वर असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सुदर्शन वनोळे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी उमेश रॉय याच्याविरुद्ध भारतीय शस्र अधिनियम कलम 3, 7, 25, 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.