वणीत गुरुदेव सेना व वंचित आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती, विविध मागण्यांचे निवेदन सादर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तहसील कार्यालयावर मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दु. 1 वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चा झाला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष चांगलेच वेधले. तालुक्यातील विविध गावातून मोर्चेकरी वणी येथील जत्रा मैदानात असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी 10 पासून जमायला लागले होते. दुपारी 12.30 वाजता मोर्चाने आपले प्रस्तान केले. 

मोर्चा शहीद भगतसिंह चौकातून गांधी बाजार, खाती चौक, छ. शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर धडकला. सदर मोर्चाला मार्गदर्शक म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे तर धम्मावती वासनिक , जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, किशोर मुन, प्रा. आनंद वेले, उमेश पळवेकर, निशिकांत पाटील, रामदास पखाले, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून सरकारचा खरपूस समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन किशोर मुन यांनी तर आभार राजू गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर विविध मागण्याचे निवेधन तहसीलदार यांना देण्यात आले.

वयोवृद्ध, विधवा माता बघिणी व दिव्यांगणा मिळणारे तुटपुंजे १ हजार निराधार मासिक वेतन वाढवून ५ हजार रुपये करण्यात यावे, निराधार लाभार्त्यांचे वय मर्यादा ६५ वर्ष असून ती  ६० वर्ष करण्यात यावी, निराधार पात्रतेसाठी २१ हजार रुपये असलेली वार्षिक उत्पनाची अट ७५ हजार रुपये करण्यात यावी,  

५ एकर खालील सर्व शेतकऱ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा ,दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेकरिता १लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात यावी, सर्व दिव्यांग नागरिकांना २ लाख रुपया पर्यंतचे व्यावसायिक कर्ज ८०% अनुदानावर विनाअट देण्यात यावे, निराधारांच्या मासिक वेतन नियमित देण्यात यावे, सर्व बेरोजगार सुशिक्षित युवक – युवतींना कायम स्वरूपी रोजगार मिळेपर्यंत १५ हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

https://wanibahuguni.com/waninews/t-10-11-oct-update-day-6-wani/
https://wanibahuguni.com/waninews/gharphodi-wani-journalist-gadgebaba-chowk/

Comments are closed.