केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची आढावा बैठक संपन्न

तक्रारीच्या पाढ्याने गाजली बैठक

0

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची एस बी हालमध्ये आढावा बैठक झाली. सादर बैठकीमध्ये वणी, झरी ,मारेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला. यामध्ये प्रामुख्याने वीज समस्या, पाणी समस्या, सफाई संदर्भात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, बियाणे वाटप व त्याविषयी तक्रारी, पीक विमा, कृषी योजनांचा आढावा, पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, मुद्रा कर्ज योजना, कर्जमाफी ,कृषी कर्ज वाटप या कृषिसबंधीत समस्यावर विशेष चर्चा करण्यात आली. या योजना राबविण्याबाबत येत असलेल्या अडचणींवर मत कशाप्रकारे करता येईल त्यावर उपाययोजना याबाबत अहीर यांनी मार्गदर्शन केले.

वीजवितरण विभागाअंतर्गत दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, कृषी पंप व सौर पंप जोडणी की ज्यामुळे वीज वितरण कंपणीद्वारे होणाऱ्या लोडशेडिंगवर मात करता येईल. या विषयावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महत्त्वाचे म्हणजे वणीतील पाणी समस्या यावर विशेष चर्चा नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्याबरोबर करण्यात आली. यासंबंधी वणीतील नगरसेवकांनी पाणी समस्येवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.

सदर कार्यक्रमात अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी व नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या व त्या कधी सोडवल्या जाईल याबाबतही विचारणा केली. काही लोकप्रतिनिधींचा याबाबत विरोधी सूरही दिसून आला. यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्याने ही फक्त भाजपच्या नेत्यांची भुलथापांची बैठक असल्याचे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, प्रकल्प संचालक कुलकर्णी ,जिल्हा परिषद सभापती ,उपसभापती, सदस्य, शिलाताई कोडपे, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक , विधुत विभागाचे अधीकारी, व  विभागाचे अधिकारी  गण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे  संचालन बच्चेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.