पुरुषोत्तम नवघरे, वणी: धुलिवंदन म्हटले की, वणीकरांनी प्रतीक्षा असते ती गुद्दलपेंडीची आणि दीड शहाणे कविसंमेलनाची. गेल्या २५ वर्षांची या कार्यक्रमाची परंपरा आहे. या वर्षीदेखील हे संमेलन शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. स्थळ पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान निश्चित झाले आहे.
वणीकरांना खळखळून हसवायला आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक दिग्गज सिनेस्टार कवी आपल्या वणीत हास्यांचा धुमाकुळ घालणार आहेत. त्यामध्ये मुंबईचे हास्यकवी विनोद सोनी, जबलपूरच्या गीतकार, गझलकारा रश्मी किरण, राजेंद्र मालविया आलसी कवी, लाफ्टर किंग ज्यु. जानी लिवर आणि फिल्म स्टार, मुजावर मालेगावी हे संमेलनाचे आकर्षण राहतील. मंच संचालन किरण जोशी करतील.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती आयोजन समितीने केली आहे. आयोजक समितीचे सदस्य राजू उंबरकर, रवी बेलुरकर, निकेत गुप्ता, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, आशीष खुलसंगे, प्रदीप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा, दीपक छाजेड, तुषार अतकरे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे हे सक्रिय सदस्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी झटत आहेत.
Comments are closed.