पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले जाणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे शिबिर होत आहे. या शिबिराचा मारेगाव तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य व शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
सदर आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व लोढा हॉस्पिटल मारेगावची चमू परिश्रम घेत आहेत. शिबिराला तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
Comments are closed.