पाटण येथील आरोग्य शिबिरात सुमारे 900 रुग्णांची तपासणी

50 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे रवाना, विजय चोरडिया यांचा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण (बोरी) येथे शुक्रवारी दिनांक 1 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यतील 900 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक बालाजी मंदिरात हे शिबिर झाले. स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन द्वारा व विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर झाल्यानंतर लगेच यातील जवळपास 50 रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. तर 450 रुग्णांना चष्मे वाटप केले जाणार आहेत.

सकाळी 10 वाजता शिबिराचे उद्घाटन झाले. उद्घाटनाला फाउंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, प्रा. डॉ. दिलीप अलोणे, विठ्ठल म्युत्तलवार, रामलू आईटवार, तुळशीराम गेडाम तथा मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आलेल्या रुग्णांना मोफत औषधी वितरण करण्यात आले. तसेच ज्यांना डॉक्टरांनी चष्मा सांगितला आहे. अशा सुमारे 450 रुग्णांना लवकरच मोफत चष्मे वाटप देखील होणार आहे.

शिबिरात सुमारे 50 रुग्णांना डॉक्टरांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. अशा रुग्णांना तातडीने सेवाग्राम येथे नेण्याची व्यवस्था फाउंडेशन द्वारा करण्यात आली. या शिबिरात बीपी आणि शुगरची देखील तपासणी झाली. या सर्व रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. सर्व रुग्ण आणि नातेवाईकांकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सामाजिक उपक्रम सुरुच राहणार – विजय चोरडिया
संपूर्ण वणी विधानभा क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य व नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्णांना सेवाग्राम येथे मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. यातील अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊन परत देखील आले आहे. यापुढेही परिसरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरुच राहणार. 

शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, चोरडिया हॉस्पिटल, वणी आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या चमुनी परिश्रम घेतले.

Comments are closed.