जमीर उर्फ जम्मू खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक: जम्मू भाई मित्र परिवार... आज वणीतील आशियाना हॉल येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर. जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन

Jadhao Clinic

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायिक व आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हमिद जवळील आशियाना हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे शिबिर चालणार आहे. यात स्त्री रोग तज्ज्ञ, मुखरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ज्ञ, नेत्र रोग तज्ज्ञ इत्यादी तपासणी करणार आहे. सदर शिबिर हे मोफत असून तपासणीनंतर आवश्यक त्या औषधी तसेच नेत्ररुग्णांना चष्मा देखील मोफत दिला जाणार आहे. या सेवेचा वणी तसेच परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, डॉ. प्रेमानंद आवारी, मुखरोग तज्ज्ञ डॉ. अमित देशपांडे (नागपूर), डॉ. सूरज चौधऱी, बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप मानवटकर, डॉ. पवन राणे, नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुबोध अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करणार आहे. इच्छुकांना हयात एक्वा (मोमिनपुरा), टपरी की चाल (टिळक चौक), व्यंकटेश कृषी केंद्र (जत्रा रोड), वैभवलक्ष्मी मेडिकल (आंबेडकर चौक) येथे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम स्थळीही ‘ऑन स्पॉट’ रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा – जम्मू खान
कोरोनाचा काळ बघून सामाजिक उपक्रमाद्वारे या वर्षीचा वाढदिवस साजरा करण्याचे मित्र परिवारांनी ठरवले आहे. या शिबिराचा वणी तसेच परिसरातील ग्रामीण भागातील लोकांनाही याच लाभ घ्यावा. जवळपास सर्व रोगांबाबतचे निदान या शिबिरात केले जाणार आहे. तसेच औषधीही मोफत दिल्या जाणार आहे. तपासणीसाठी जे रुग्ण येणार आहे, त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
– जमीर उर्फ जम्मू खान, संचालक आमेर डेव्हलपर्स

या आरोग्य तपासणी शिबिराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जम्मूभाई मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!