वणी तालुक्यात पावसाचा थैमान, नदी नाले ओव्हरफ्लो

पेटूर नाल्यात पूर, वणी मुकुटबन मार्गावर वाहतूक ठप्प

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी पासून सुरु मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला आहे. दुपारी 12 वाजता पासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहे. निर्गुडा नदी दुथडी वाहत आहे. वणी मुकुटबन मार्गावर पेटूरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने राज्यमार्गावर वाहतूक खोळंबली आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात घोन्सा,कायर, पठारपूर, रांगणा भुरकी, चारगाव वारगाव व इतर अनेक गावात जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यांमध्ये पूर आल्याने वाहतूक बंद होऊन संपर्क तुटल्याची माहिती आहे.वणी शहराला लागून असलेली निर्गुडा नदी दुथडी वाहत असल्यामुळे नदी काठावरील वस्तीतील नागरिकांना सतर्क राहणाचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुराच्या पाण्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता महसूल विभाग, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहे. तालुक्यात अद्याप कुठेही मोठं नुकसान झाल्याची माहिती नाही.

Comments are closed.