झरी तालुक्यातील बारावीचा निकाल ८३.५८ टक्के

मुकुटबन येथील पुनकाबाई आश्रम शाळेतील दोन विद्यार्थी अव्वल

0

सुशील ओझा, झरी: उच्च माध्यमिक शाळांत फेब्रु-मार्च २०१८  चा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात झरीजामनी तालुक्याचा  निकाल 83.58 टक्के  लागला आहे. तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक नऊ शाळां दरम्यान साधारणतः तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या. झरीजामनी तालुक्यात मुकुटबंन येथील मातोश्री पुनकाबाई ज्युनिअर कालेज मधील विज्ञान शाखेतून कु.गीतांजली अरुण येवले ७४.१५ टक्के, कु.शीतल नीलकंठ ठेंगणे 73.07 टक्के , कु.प्रणाली विनोद असुटकर ७१.८४ टक्के तर कला शाखेतून कु .रुपाली रामकीशन पारशिवें ८४.७६ टक्के, संकेत चंद्रकांत आंबठकर ७९.३८ आणि  कु. सुस्मिता सुखराम चव्हाण ७६.४६ टक्के यांनी  प्रथम क्रमांक पटकाविला आहेत.

राजीव विद्यालय झरीजामनी ७६.५६%, राजीव ज्युनिअर कालेज पाटण ९२.५९ % आदर्श ज्युनिअर कालेज ७७.७३ %, शासकीय आश्रम शाळा शिबला ९३.७५ % सुर्यतेज उच्च माध्यमिक  विद्यालय झरीजामनी ८२.०५ %, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापूर ७५.०० %, मातोश्री पुनकाबाई ज्युनिअर कालेज मुकुटबंन ९६.६८ %, बालाजी ज्युनिअर कालेज माथार्जुन ७०.४५ % आणि सुर्यतेज कालेज झरीजामनी ७८.५७ टक्के याप्रमाणे लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.