HSC निकाल: कु. युक्ता प्रमोद बैद व जया पांडे शहरातून प्रथम

जितेंद्र कोठारी, वणी: आज गुरूवारी दुपारी 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान, कला व वाणिज्य या तिन्ही शाखेतून शहरातून मुलीच प्रथम आल्या आहेत. लॉयन्स ज्यु. कॉलेजची कु. युक्ता प्रमोद बैद ही 89.83 टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेतून शहरातून तसेच तालुक्यातून प्रथम आली आहे. तर लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु. श्रावणी सुनिल बोर्डे ही 89.05 टक्के गुण घेऊन शहरातून द्वितीय आली आहे. वणी पब्लिक ज्यु. कॉलेजची वाणिज्य शाखेतील कु. जया पांडे ही 92.17 टक्के गुण घेत शहरातून व तालुक्यातून सर्व शाखेतून सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थीनी ठरली आहे.

लोकमान्य टिळक महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून कु. श्रावणी सुनिल बोर्डे ही 89.05 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. तर कु. सोनम रघुवीर चंदेल ही 86.33 टक्के गुण घेऊन द्वितीय तर पार्थ अनिल ढेंगळे हा 84.16 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. कला शाखेत वसंत संतोष जेउरकर हा 74.83 टक्के गुण घेऊन प्रथम आला तर वाणिज्य शाखेतून कल्याणी अशोक डाहुले ही 84.83 टक्के घेऊन प्रथम तर कु. निकिता दत्तू टोंगे ही 83.33 टक्के व कु. शताक्षी गिरीधर वासेकर ही 83 टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतिय आल्या आहेत.

शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) ज्यु. कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर कला शाखेचा 55 टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेतून आयुष वसंत ठाकरे 85 टक्के गुण घेऊन प्रथम तर कु. प्रांजली अविनाश परसावार 82.83 टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे. कला शाखेतून कु. नंदिनी ऋषी रायपुरे ही 78.17 टक्के गुण प्रथम आली आहे.

वणी पब्लिक स्कूलमध्ये कॉमर्स शाखेची जया पांडे ही 92.17 टक्के गुण घेऊन प्रथम आली तर स्नेहा कोठारी 87.33 टक्के व वैष्णवी नानपांडे ही 85.33 टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतिय आली आहे. विज्ञान शाखेतून प्रणय प्रमोद कनमनकर हा विद्यार्थी 79.67 टक्के घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 97.61 टक्के लागला तर कॉमर्स शाखेचा 90 टक्के निकाल लागला.

लॉयन्स ज्यु. कॉलेजचा निकाल 97.29 टक्के लागला. युक्ता प्रमोद बैद ही 89.83 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर अनघा दिलीप कोटरंगे द्वितीय, आंचल गजानन दोडके तृतिय तर स्नेहा धर्मेंद्र चौरासिया, कु. अल्फिया एजाज पठाण या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. परीक्षेला 74 नियमीत विद्यार्थी बसले होते. त्यातील 72 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

Comments are closed.